Tips and Tricks : डाळी, तांदूळ, पीठ किडेमुक्त ठेवण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स
पावसाळ्यात गारवा, ओलाव्यामुळे अन्नपदार्थ, धान्य, डाळी यांच्यात कीड लागू शकतो. अशा परिस्थितीत काय करावं, कोणत्या घरगुती उपायांनी हे टाळता येईल, ते जाणून घेऊया.

बरेच लोकं एकाचवेळी भरपूर गहू खरेदी करून ते साठवून ठेवतात. मात्र असं करताना त्यात कीड लागण्याचा धोका असतो. ते टाळण्यासाठीच कडुलिंबाची वाळलेली पानं त्यासोबत ठेवावी. साठवणीचे गहू ड्रममध्ये ठेवण्याआधी खआली कडुनिंबाची पानं ठेवा, त्यावर गहू भरा. मोठी लेअर झाल्यावर पुन्हा पानं ठेवा, असं करत संपूर्ण गहू स्टोअर करा. (Images: Pexels)
पावसाळ्यात तांदूळ स्टोअर करताना त्यात पोरकिडे होण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे तांदूळ साठवताना त्यात तमालपत्र किंवा अख्खी हळद ठेवा. अशाने तांदळामध्ये किडे होत नाही. या दोन्ही गोष्टींच्या गंधामुळे कीडे दूर राहतात. तसेच तांदूळ हे एअरटाइट डब्यात ठेवावोत, म्हणजे त्यांना ओलावा लागणारा नाही.
पाऊस असताना साखरेत मुंग्या होत असतील तर याचा अर्थ असा की त्याला ओलावा लागतोय. म्हणूनच साखर नेहमी एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवा. तसेच साखरेच्या डब्यात लवंग ठेवा किंवा दाचिनी घालून ठेवा, त्यामुळे मुंग्या लागत नाहीत.
जर एखाद्या पीठामध्ये घुण किंवा पांढऱ्या रंगाचे किडे लागल्यास त्यापासून बचाव करण्यासाठी पीठ, मैदा, बेसन इत्यादी साठवताना त्यामध्ये सुक्या मिरच्या टाकून ठेवा. उदाहरणार्थ, 10 किलो पीठ असेल तर त्यामध्ये कमीत कमी 20 ते 25 सुक्या लाल मिरच्या टाका. याशिवाय, त्यामध्ये खडे मीठही घालू शकता.
पावसाळ्यात डाळी साठवायच्या असतील, तेव्हा त्यामध्ये फक्त 1 छोटा चमचा मोहरीचे तेल घालून हाताने चांगलं मिसळा. त्यानंतर डाळी वेगवेगळ्या डब्यांमध्ये भरून साठवून ठेवा. याशिवाय, डाळीच्या डब्यांमध्ये सुक्या लाल मिरच्या आणि काही लवंगा देखील टाकून ठेऊ शकता.