AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड? लँडिंगवेळी अडचण, लखनऊच्या विमानतळावर नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील लखनऊमधून मोठी बातमी समोर आली आहे. अमौसी विमानतळावर दिल्लीहून येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-1717 या विमानाला लँडिंगच्या काही क्षण आधी ‘गो-अराउंड’ करावे लागले. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील याच विमानातून प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे.

राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड? लँडिंगवेळी अडचण, लखनऊच्या विमानतळावर नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi PlaneImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 08, 2026 | 6:24 PM
Share

उत्तर प्रदेशातील लखनऊमधून मोठी बातमी समोर आली आहे. अमौसी विमानतळावर दिल्लीहून येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-1717 या विमानाला लँडिंगच्या काही क्षण आधी ‘गो-अराउंड’ करावे लागले. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील याच विमानातून प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्यांदा लँडिंग करताना विमानाचा एप्रोच अस्थिर झाल्याने (Unstable Approach) पायलटने सुरक्षेच्या दृष्टीने लँडिंग थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विमान पुन्हा हवेत उंच नेण्यात आले आणि नव्या एप्रोचसाठी ते पाठवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

दुसऱ्या प्रयत्नात विमानाचे सुरक्षित लँडिंग

पहिल्या प्रयत्नानंतर विमानाने पुन्हा लखनऊ विमानतळाच्या धावपट्टीकडे एप्रोच घेतला. दुसऱ्या प्रयत्नात AI-1717 विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले. यावेळी विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित असल्याची माहिती आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील याच विमानाने दिल्लीहून लखनऊला पोहोचल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या प्रयत्नात लँडिंग यशस्वी न झाल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात विमान सुखरूप उतरल्याने परिस्थिती सामान्य झाली.

दुपारी 2:20 वाजता दिल्लीहून निघाले होते विमान

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे AI-1717 विमान दुपारी सुमारे 2:20 वाजता दिल्लीहून रवाना झाले होते. हे विमान साधारण 3:30 वाजता लखनऊला पोहोचणे अपेक्षित होते. लँडिंगच्या पहिल्या प्रयत्नात एप्रोच अनस्टेबल असल्याने विमानाला गो-अराउंड करावे लागले. त्यानंतर दुसऱ्या एप्रोचमध्ये विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले. उपलब्ध माहितीनुसार, ही घटना पायलटने अवलंबलेल्या सुरक्षा प्रक्रियेशी संबंधित होती. एप्रोच अनस्टेबल असल्यास विमानाला गो-अराउंड करणे ही सुरक्षित लँडिंग सुनिश्चित करण्यासाठी अवलंबली जाणारी सामान्य प्रक्रिया आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचीही घटना

एअर इंडिया एक्सप्रेसचे Boeing 737 विमान IX415 हे 7 सप्टेंबर रोजी कोचीहून अबू धाबीला जात होते. सुमारे 36 हजार फूट उंचीवर असताना विमानाच्या इंजिन-1 मधील ऑईलचे प्रमाण वेगाने कमी होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पायलटने इंजिन बंद करून विमान कोचीला परत आणण्याचा निर्णय घेतला. विमानाचे कोची विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाले. त्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानाने अबू धाबीला पाठवण्यात आले.

Follow Us
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत