
आज सकाळपासूनच आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी बहिणी निघाल्या असल्यामुळे सकाळपासूनच जळगाव बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहेत.

५ ते १० हजार किलोमीटर वाढीचे उद्दीष्ट दिले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आज रक्षाबंधन या सनाच्या पार्श्वभूमीवर १२५ बस फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा एकाच दिवशी आल्याने लांब आणि मध्यम मार्गावर जादा गाड्यांचे नियोजन करून भारमान वाढविण्यासाठी विभागाने प्रयत्न सुरु केले आहेत.

रक्षाबंधन सणाच्या दिवशी प्रवाशांची अपेक्षित होणारी गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने प्रत्येक आगारांना एसटीच्या फेऱ्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.