
रक्षाबंधनाची तयारी आतापासूनच सुरू असल्याचे बघायला मिळतंय. यंदा 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. यादिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात. बहिण आणि भावाचा हा खास सण आहे.

सध्याच्या धावपळीच्या जीवनात बऱ्याचदा रक्षाबंधनाच्या दिवशी भावा बहिणीची भेट होत नाही. अशावेळी आपल्या भावाला खास शुभेच्छा बहिणीकडून पाठवल्या जातात.

आपलं नात मी आणि तू सदैव जपलंय...हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी कायमचसोबत आहेत... आज हातातल्या राखीसोबतच..तुला शुभेच्छा..

आज तुझ्या हाती औक्षिते प्रेमाने...उजळुनी दीपज्योती, अन् अशीच फुलावी प्रीती तू असाच आनंदी राहा. तुझी बहिणी सदैव तुझ्यासोबत आहे.

आज सण रक्षाबंधनाचा...लहापणीच्या आठवणी आल्या डोळ्यासमोर...हळव्या रेशीमगाठी उजळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते, माझ्या भावा असाच माझ्यासोबत रहा...

रक्षणाचे वजन, प्रेमाचा गंध, बहिण-भावाच्या या पवित्र सणी माझ्या लाडक्या भावाला खूप खूप आणि मनापासून हार्दिक शुभेच्छा...