
दिग्दर्शक नितेश तिवारी आणि प्रोड्यूसर नमित मल्होत्रा यांचा 'रामायण' हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट ठरणार आहे. त्याचे बजेट सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडे आहे.दोन भागात बनवल्या जाणाऱ्या रामायणाचे बजेट 4 हजार कोटी रुपये आहे, असे नमितने अलीकडेच सांगितलं होतं. या चित्रपटाचा पहिला भाग 2026 च्या दिवाळीला येईल. हा चित्रपट रिलीज व्हायला खूप वेळ असला तरी चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. , चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. त्याआधीच आपण रामायण चित्रपटात काम करणाऱ्या मुख्य कलाकारांच्या शिक्षणाबद्दल जाणून घेऊया.

रामायणामध्ये अभिनेता रणबीर कपूर हा श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. दोन्ही भागांसाठी त्याला 150 कोटी रुपये फी मिळणार आहे. मुंबईतील स्कॉटिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, रणबीरने एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून प्री-युनिव्हर्सिटी शिक्षण घेतले. यानंतर, त्याने न्यू यॉर्कमधील स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्समध्ये फिल्म मेकिंगचा कोर्स केला.

तर या चित्रटात सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे दक्षिणेकडील अभिनेत्री साई पल्लवी.. या भूमिकेसाठी तिला 6 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. तिच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, साई पल्लवीने तिबिलिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी (TSMU) मधून एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे.

ज्येष्ठ अभिनेता सनी देओल हा या चित्रपटात परम रामभक्त हनुमानाची भूमिका साकारत आहे. सनीनेही चांगले शिक्षण घेतले आहे. त्याचे शालेय शिक्षण मुंबईत झाले, तर नंतर सनी देओलेने रामनिरंजन आनंदीलाल पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून कॉमर्सची पदवी पूर्ण केली.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता रवी दुबे हा नितेश तिवारी आणि नमित यांच्या चित्रपटात श्रीराम यांचे धाकटे भाऊ लक्ष्मण यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याने मुंबईतील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून टेलिकॉम इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.

तर कन्नड चित्रपटसृष्टीतील स्टार यश हा रामायणा चित्रपटात लंकापती रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. यशने म्हैसूरच्या महाजन हायस्कूलमधून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने एसबीआरआर महाजन प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजमधून पुढील शिक्षण पूर्ण केले.