
अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या नवीन बंगल्याचं बांधकाम जवळपास पूर्ण झालं आहे. बुधवारी रणबीर, आलिया आणि नीतू कपूर या बंगल्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. मुंबईतील वांद्रे याठिकाणी हा नवीन बंगला बांधण्यात आला आहे.

रणबीरचा हा नवीन बंगला शाहरुख खानच्या 'मन्नत'लाही टक्कर देणारा आहे. फोटोत दिसणारी ही संपूर्ण इमारतच रणबीरची आहे. गेल्या काही महिन्यांपासून या बंगल्याचं बांधकाम सुरू आहे. आता जवळपास ते पूर्णत्वास आलं आहे.

रणबीर या बंगल्याच्या बाल्कनीमध्ये उभा राहून त्याने काही वेळ आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. गेल्या काही महिन्यांत रणबीर, आलिया आणि नीतू यांनी अनेकदा बंगल्याच्या बांधकामाची पाहणी केली आहे. या बंगल्याला सध्या रणबीरची आजी कृष्ण राज यांचं नाव आहे.

रणबीर आणि आलिया त्यांच्या या नव्या बंगल्याला लेक राहाचं नाव देणार असल्याचीही चर्चा आहे. याची किंमत तब्बल 250 कोटींच्या घरात असल्याचं कळतंय. शाहरुखचा 'मन्नत' आणि अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा'प्रमाणेच रणबीरचा हा आलिशान बंगला असेल.

हा बंगला राज कपूर आणि त्यांची पत्नी कृष्ण राज यांच्या नावे होता. त्यांनी नातू रणबीरच्या नावे हा बंगला केला. आता रणबीरने त्या बंगल्याची पुनर्बांधणी केली आहे. रणबीर आणि आलिया लवकरच या घरात राहायला जाणार आहेत.