Ramayana : साई पल्लवी की क्रिती सेनन , सीतेची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी कोणाला मिळाली सर्वाधिक फी ?

रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटात साई पल्लवी सीतेची भूमिका साकारत आहे. आदिपुरुषमध्ये क्रिती सेनन हिनेही सीतेची भूमिका साकारली होती. या दोघांपैकी कोणाला या भूमिकेसाठी जास्त पैसे मिळाले ? ते जाणून घेऊया.

| Updated on: Jul 16, 2025 | 1:41 PM
1 / 7
आजकाल एका चित्रपटाची खूप चर्चा होत आहे, तो म्हणजे रामायण. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. भव्य बजेट आणि मोठी स्टारकास्ट यामुळे चित्रपटाची खूप चर्चा होत आहे.

2 / 7
'रामायण' हा दोन भागांचा चित्रपट असेल. दोन्ही भागांचे बजेट मिळून तब्बल 4 हजार  कोटी रुपये आहे. या चित्रपटात अभिनेत्री साई पल्लवी ही सीतामाईची भूमिका साकारत आहे. इतक्या मोठ्या बजेटमध्ये बनवल्या जाणाऱ्या या चित्रपटासाठी तिला किती पैसे मिळाले ते तुम्हाला माहीत आहे का  ?

3 / 7
रिपोर्ट्सनुसार, सीतेची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री साई पल्लवीला दोन्ही भागांसाठी 12  कोटी रुपये मिळाले आहेत. म्हणजेच तिला प्रत्येक भागासाठी 6 कोटी रुपये मिळाले आहेत. ती आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

4 / 7
तर 2 वर्षांपूर्वी, म्हणजे 2023 साली आदिपुरुष नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. तो चित्रपटही रामायणावर आधारित होता. त्या चित्रपटात क्रिती सेननने सीतेची भूमिका साकारली होती. पण त्या चित्रपटात, क्रितीची फी साई पल्लवीपेक्षा कमी होती.

5 / 7
रिपोर्ट्सनुसार, क्रिती सॅननला आदिपुरुषसाठी 3 कोटी रुपये मिळाले. म्हणजेच साई पल्लवीपेक्षा 3 कोटी कमी मिळाले. पण 'आदिपुरुष' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

6 / 7
काही काळापूर्वी 'रामायण' च्या अनाउंसमेंटचा व्हिडिओ आला होता, तेव्हापासूनच चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. लोकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. नितेश तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

7 / 7
तर नमित मल्होत्रा 'रामायण'चे निर्माते आहेत. या दोन्ही भागांचे बजेट 4 हजार कोटी रुपये असल्याचे त्यांनीच सांगितलं. या बातमीमुळे चित्रपटाबद्दल लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. अभिनेता यश देखील या चित्रपटाचा एक भाग असून तो रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहे.