Ranbir Kapoor-Alia Bhatt: 100 फुटांवर होते 3 सिंह, जंगलात गुडघ्यावर बसून आलियाला केलं प्रपोज; रणबीरने किस्सा सांगताच अमिताभ बच्चन म्हणाले..

Ranbir Kapoor-Alia Bhatt: तीन सिंहांपासून अवघ्या 100 फुटांवर रणबीर कपूरने आलिया भट्टला प्रपोज केलं होतं. जंगलात गुडघ्यावर बसला अन् म्हणाला, 'बेबी, माझ्याशी लग्न करशील?'

| Updated on: Oct 30, 2026 | 11:59 AM
1 / 8
Ranbir Kapoor-Alia Bhatt: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपं रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या प्रेमकहाणीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. या दोघांची पहिली भेट, प्रेमाची सुरुवात आणि लग्नाचे किस्से अनेकदा चर्चेत येतात. आता रणबीरने आलियाला प्रपोज केल्याचा एक खास किस्सा सांगितला आहे.

Ranbir Kapoor-Alia Bhatt: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपं रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या प्रेमकहाणीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. या दोघांची पहिली भेट, प्रेमाची सुरुवात आणि लग्नाचे किस्से अनेकदा चर्चेत येतात. आता रणबीरने आलियाला प्रपोज केल्याचा एक खास किस्सा सांगितला आहे.

2 / 8

विशेष म्हणजे, रणबीरने आलियाला एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये किंवा रोमँटिक ठिकाणी नव्हे, तर जंगलात प्रपोज केलं होतं. यावेळी त्यांच्या आसपास चक्क तीन सिंह होते. रणबीरने अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती 18' या शोमध्ये हा मजेशीर आणि रोमँटिक किस्सा सांगितला.

3 / 8

रणबीर कपूरने 2022 मध्ये केनियातील मसाई मारा इथं सुट्टीदरम्यान आलिया भट्टला लग्नासाठी विचारलं होतं. या खास क्षणाचं त्याने आधीपासूनच नियोजन केलं होतं. रणबीरने तिथल्या गाईड आणि ड्रायव्हरला आधीच याबद्दल सांगितलं होतं. जंगलाच्या मध्यभागी एखाद्या सुंदर ठिकाणी गाडी थांबवण्याची सूचना त्याने त्यांना दिली होती.

4 / 8

तसंच आपण आलियासमोर गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करणार असल्याने त्यांनी थोड्या अंतरावरून या खास क्षणाचे फोटो काढावेत, अशीही व्यवस्था केली होती. याबद्दल बोलताना रणबीर म्हणाला की, त्याने घरूनच अंगठी आणली होती. मुलींना फोटो काढायला आणि ते इन्स्टाग्रामवर पोस्ट करायला आवडतात, त्यामुळे आलियासाठी हा क्षण फोटोमध्ये टिपला जाणं महत्त्वाचं होतं, असं त्याने मजेशीरपणे सांगितलं.

5 / 8

रणबीरचा हा किस्सा ऐकून शोचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिली. प्रपोज केल्याचा पुरावा असायला हवा, असं बिग बी म्हणाले. त्यावर रणबीरने पुढचा किस्सा सांगितला.

6 / 8

तो म्हणाला, "अंगठी तर माझ्याकडे होती आणि मी ती घरून आणली होती. पण तिथलं वातावरणच असं होतं की, एका बाजूला जवळपास 100 फुटांवर तीन मोठे सिंह उभे होते. माझी सिंहिण माझ्यासमोर उभी होती आणि मी मात्र उंदरासारखा गुडघ्यावर बसून तिला विचारत होतो, 'बेबी, माझ्याशी लग्न करशील का?'"

7 / 8

रणबीरच्या या उत्तरानंतर सेटवर एकच हशा पिकला. आलियाला 'सिंहिण' आणि स्वतःला 'उंदीर' म्हणत त्याने हा प्रसंग अतिशय मजेशीर पद्धतीने सांगितला. हा अनुभव आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचंही त्याने सांगितलं.

8 / 8

रणबीर आणि आलियाची जवळीक 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वाढली होती. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 14 एप्रिल 2022 रोजी दोघांनी मुंबईतील राहत्या घरी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांच्या घरी राहा या मुलीचा जन्म झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us