
2016 साली आलेला 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपट खूप गाजला. खरंतर त्यात अनुष्का शर्मा आणि रणबीरची गोष्ट दाखवली होती. पण सगळ्यांचं लक्ष तर ऐश्वर्या रायनेच वेधलं.

या चित्रपटात तिने तिच्यापेक्षा बराच लहान असलेला अभिनेता रणबीर कपूर सोबत इंटिमेट सीन केले होते, ज्याची बरीच चर्चा झालीय

हे सीन शूट करणं ऐश्वर्यासाठी सोपं होतं पण रणबीरसाठी खूप कठीण. एका मुलाखतीत त्यानेच याचा खुलासा केला होता.

रणबीरने आत्तापर्यंत श्रद्धा कपूर, दीपिका, आलिया, सोनम कपूर सारख्या अेक अभिनेत्रींसोबत रोमान्स केला. पण 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये ऐश्वर्यासोबत रोमान्स करणं त्याच्यासाठी कठीण होतं.

ऐश्वर्यासोबत रोमान्स करताना मी खूप नर्व्हस झालो होतो. माझे हात थरथरत होते. मी तिच्या गालाला हात लावू शकत नव्हतो, खूप लाजत होतो.

सीन नीट शूट करता येत नव्हता तेव्हा ऐश्वर्यानेच रणबीरला समजावलं. त्याला हिंमत दिली. पुढे मी विचार केला की अशी संधी ( ऐश्वर्यासोबत रोमान्स करण्याची) पुन्हा मिळणार नाही, असे रणबीर गमतीत पुढे म्हणाला. त्यांचा हा चित्रपट खूप गाजला. रणबीर-ऐश्वर्याची केमिस्ट्रीही लोकांना खूप आवडली.