PHOTO | ‘प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर’ छत्रपती शिवाजी महाराजांची काही दुर्मिळ छायाचित्रे!

| Updated on: Feb 19, 2021 | 2:08 PM

‘प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर’ छत्रपती शिवाजी महाराजांची काही दुर्मिळ छायाचित्रे!

1 / 7
शहाजी महाराज (गादीवर बसलेले) आणि त्यांची दोन पुत्र संभाजी (पुढे बसलेले) आणि शिवाजी (पाठीमागे बसलेले) असं ह्या चित्रच स्वरूप असून ते तंजावर मधील भोसले घराण्याने १७व्या शतकात काढले. ह्या चित्रची अजून एक प्रत ही फलटणच्या नाईक-निंबाळकर घराण्याकडे आहे.

2 / 7
साधारपणे 18व्या शतकांत काढलेलं हे चित्र, सध्या बडोदा संग्रहालयात आहे. यात महाराजांच्या हातात पट्टा, तर दुसऱ्या हातात फुल आहे.

3 / 7
अंबर राजघराण्याचे वयक्तिक दप्तर म्हणजेच जयपूर चा ‘जयपूर पोथीखाना’ येथे हे चित्र सापडले असून हे 18व्या शतकातील आहे. चित्रामध्ये महाराजांनी उजव्या हातात खंजीर, डाव्या हातात फुल, कमरेला ढाल आणि तलवार लटकावलेली दिसत आहे.

4 / 7
हॉलंड मधील रिक्स म्युसीयम मध्ये ठेवलेले हे चित्र आहे. 1675-1685 असा या चित्राचा कालखंड मानला जातो. या चित्रावर 'Siwagii prince in decam' असे लिहलेले आहे.

5 / 7
इतिहासचार्य वा. सी. बेंद्रे यांनी हे चित्र उपलब्ध करून दिले होते. बेंद्रे यांनी हे चित्र कॉलिन मॅकेंझी या ब्रिटिश इतिहासकाराच्या मॅकेंझी कलेक्शन या ग्रंथातून 1920 मध्ये कॉपी करून भारतात आणले होते. मॅकेंझी कलेक्शनमध्ये शिवरायांचे चित्र 1826 मध्ये प्रकाशित झाले होते. शिवरायांचे हे चित्र हे फान्सवा वालेन्तैन या डच अधिकाऱ्याच्या 1726 मध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथातील शिवाजी महाराजांच्या चित्रावर बेतले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे 'मूळ चित्र' म्हणून राज्य सरकारने नुकतीच एका चित्राला मान्यता दिली आहे.

6 / 7
हे छत्रपती शिवाजी महारांचे मूळ छायाचित्र असल्याचे म्हटले जाते. सध्या हे लंडन मधील एक संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आले आहे.

7 / 7
हे तैलचित्र राजा रवी वर्मा यांनी काढलं होतं, इयत्ता चौथीच्या पुस्तकाचा हा कव्हर फोटो आजही सर्वांच्या मनावर बिंबवलेला आहे.