
ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीला फार महत्त्व आहे. ग्रहांची चाल बदलली की सर्वच 12 राशींवर प्रभाव पडतो. जून महिन्यात बुध, मंगळ, सूर्य या ग्रहांची चाल बदलणार आहे. त्यामुळेच एकूण चार राशींवर परिणाम पडणार आहे.

मेष राशी : या ग्रहांच्या बदललेल्या चालींमुळे मेष राशी असणाऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. नोकरी, व्यवसाय यांच्यात यश मिळेल. पारिवारिक सुख, शांती मिळेल. सर्व स्वप्न साकार होतील.

मिथून राशी : जून महिना हा मिथून राशी असणाऱ्यांना चांगला ठरणार आहे. या महिन्यात बऱ्याच काळापासून अडकलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबातील धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. प्रमोशन तसेच अप्रेझलची शक्यता वाढेल.


कन्या राशी : ग्रहांची दशा बदलल्यामुळे कन्या राशी असणाऱ्यांनाही फायदा होईल. कामामध्ये तुमची प्रगती होईल. आर्थिक समस्या दूर होतील. वेगवेगळ्या मार्गांनी पैसा चालून येईल. वैवाहिक जीवनात आनंद येईल. आरोग्यावर लक्ष द्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.