
केतू हा मायावी ग्रह असल्याचे म्हटले जाते. हा ग्रह नेहमी आपली चाल बदलत अतो. त्याचा परिणाम अनेक राशींवर होते. कुंडतील केतूची स्थिती चांगली असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात अनेक चांगले बदल होतात असे मह्टले जाते.

दरम्यान 18 मे रोजी केतूने सिंह राशीत प्रवेश केलेला आहे. केतूच्या याच स्थितीचा काही राशींना चांगला फायदा होऊ शकतो. या राशीत केतू डिसेंबर 2026 पर्यंत राहणार आहे.

केतूच्या याच चालीचा धनू राशीला फार फायदा होऊ शकतो. सिंह ही सूर्याची रास आहे. या राशीत केतू आल्याने धनू राशीच्या लोकांचा भाग्योदय होणार आहे. तुमचा व्यापार वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा शूभ काळ असणार आहे. तसेच या काळात धनलाभ होण्याची शक्यता आहे.

केतूच्या स्थितीचा कर्क राशीच्या लोकांनाही फायदा होणार आहे. यश मिळवण्यासाठी जास्त मेहनत करण्याची गरज भासणार नाही. तसेच एखादी चांगली बातमी या काळात मिळू शकते. घरात सुख-शांतीचे वातावरण असेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते.

वृश्चिक राशीच्या लोकांना केतूच्या गोचरचा फायदा होणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात असलेल्या अडचणी दूर होतील. कुटुंबातील सदस्यांची भरपूर साथ मिळेल. जोडीदारासोत आरामाचे दिवस येतील. आरोग्य चांगले राहील.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.