
ग्रहांची दिशा नेहमीच बदलत असते. ही दिशा बदलली त्याचा परिणाम व्यक्तीच्या आयुष्यावर होतो, असे ज्योतिषशास्त्रात म्हटले जाते. सध्या बुध ग्रह 18 जुले रोजी वक्री होणार आहे. त्यामुळे त्याचा चार राशींवर परिणाम पडणार आहे. बुध वक्री होणार असल्याने आता चार राशींचं नशीब बदलणार असल्याचं बोललं जात आहे. बुध ग्राहीची ही वक्री चाल 1 ऑगस्ट 2025 पर्यंत राहणार आहे. बुध ग्रह कर्क राशीत वक्री झाल्याने इतर काही राशींना त्याचा विशेष फायदा होणार आहे.

एकूण चार राशींना लॉटरी लागू शकते. यात पहिल्या क्रमांकावर मेष राशीचा समावेश आहे. बुध ग्रह वक्री झाल्याने मेष राशीवाल्यांना कौटुंबिक पातळीवर चांगले परिणाम दिसतली. तसेच या काळात जुने वाद मिटतील. करिअरमध्ये चांगली संधी मिळू शकते. त्यामुळे आर्थिक स्थिती आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.

बुध ग्रह वक्री होणार असल्याने त्याचा फायदा कर्क राशीला होणार आहे. या काळात कर्क राशीच्या लोकांना सुरुवातीला काही निर्णय घेणे अवघड जाईल. पण नंतर मात्र या निर्णयाचे चांगले परिणाम दिसून येतील. तुमच्यातल्या कलागुणांना दाखवण्याची संधी मिळेल. आर्थिक दृष्टीने मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशीलाही बुध ग्राहाच्या वक्री चालीचा फायदा होईल. या काळात तुम्हाला विदेश यात्रा करण्याचा योग जुळून येईल. अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. खोळंबलेले काम तडीस जाईल.

मीन राशीलाही बुधच्या वक्री चालीचा फायदा होईल. प्रेमसंबंध पहिल्यापेक्षा चांगले होईल. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तसेच संगीत, कला आदी रचनात्मक क्षेत्रासी जोडले गेल्यामुळे तुम्हाला तुमच्यातले कलागुण दाखवण्याची संधी मिळेल.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.