AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : वर्ल्ड कप दोन दिवसांवर आलेला असताना टीम इंडियासाठी वाईट बातमी

T20 World Cup 2026 : टी 20 वर्ल्ड कप 2026 दोन दिवसांवर आलाय. मात्र, त्याआधी टीम इंडियाला एक मोठा धक्का बसलाय. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना अमेरिकेविरुद्ध आहे. भारत यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये गतविजेता म्हणून मैदानात उतरणार आहे.

T20 World Cup 2026 : वर्ल्ड कप दोन दिवसांवर आलेला असताना टीम इंडियासाठी वाईट बातमी
Team India Image Credit source: GETTY
| Updated on: Feb 05, 2026 | 9:40 AM
Share

T20 वर्ल्ड कप दोन दिवसांवर आलेला असताना टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना दुखापत होण्याचा सिलसिला कायम आहे. आता या यादीत टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा समावेश झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वॉर्म अप मॅचमध्ये हर्षितला इंजरी झाली. त्याला खूप त्रास होत असल्याचं दिसलं. तो व्यवस्थित दोन पावलं चालूही शकत नव्हता. हर्षित राणाने गुडघे पकडलेले व लंगडत चालत होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वॉर्मअप मॅचचे सामन्यातील हे जे फोटो समोर आलेत, त्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं आहे. टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना USA विरुद्ध होणार आहे.

मुंबईत काल 4 फेब्रुवारीला भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये T20 वर्ल्ड कप 2026 ची वॉर्म अप मॅच झाली. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 30 धावांनी हरवलं. याच मॅचमध्ये हर्षित राणाला दुखापत झाली. तो मोठ्या मुश्किलीने आपली एक ओव्हर टाकू शकला, यातून त्याला झालेल्या दुखापतीचं गांभीर्य लक्षात येतं. त्या एका ओव्हरमध्ये हर्षितने 16 रन्स दिले.

टीमला महाग पडू शकतं

Sportstar नुसार हर्षित राणाला दुखापतीमुळे एका ओव्हरमध्ये दोनवेळा रनअप घेऊन थांबावं लागलं. त्यानंतर तो गुडघे पकडून मैदानाबाहेर गेला. हर्षित राणाला झालेली दुखापत किती गंभीर आहे, त्या बद्दल कुठलीही अधिकृत माहिती नाहीय. हर्षित राणाची दुखापत गंभीर निघाली, तर टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात. हर्षित राणा ऑलराऊंडर आहे. त्यामुळे त्याची दुखापत टीमला महाग पडू शकते.

तेव्हापासून तो टीम इंडियाच्या बाहेर

हर्षितच्या आधी टीम इंडियाचा आणखी एक ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झालीय. न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजच्या पहिल्या सामन्यात सुंदरला इंजरी झाली. तेव्हापासून तो टीम इंडियाच्या बाहेर आहे. तो लवकरच फिट होईल असं बोललं जातय. पण या बद्दल कहाही ऑफिशियल नाहीय. तिलक वर्मा आत्ताच फिट होऊन परतलाय. अक्षर पटेल त्याच्या बोटाला झालेला दुखापतीमधून सावरलाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वॉर्म अप मॅचमध्ये त्याने एक ओव्हरमध्ये 2 रन्स देऊन 1 विकेट घेतला.

शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?.
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!.
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!.
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला.
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश.
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल.
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल.
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले.
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल.