
शनी ग्रहाच्या चालीत परिवर्तन झाले की त्याचा परिणाम अनेक राशींवर पडतो. आता शनी देव पुढच्या 138 दिवस वक्री चाल चालणार आहे. त्यामुळे शनी आता मीन राशीत विराजमान होणार आहे.

शनीने 13 जुलैपासून वक्री चाल चालण्यास सुरुवात केली आहे. शनीच्या वक्री चालीचा प्रभाव सर्वच 12 राशींवर पडणार आहे. मात्र काही राशींवर 28 नोव्हेंबरपर्यंत शनी ग्रहाची कृपा बरसणार आहे.

मिथून राशीसाठी शनी देवाची वक्री चाल फारच लाभदायक ठरणार आहे. या काळात मिथून राशीच्या लोकांच्या अडचणी कमी होतील. नोकरीत यश मिळेल. मित्रांची मदत लाभेल तसेच वैवाहिक जीवन सुख आणि शांतीत जाईल .

शनी वक्री चालीत जात असताना कर्क राशीला त्याचा विशेष फायदा होणार आहे. शनीच्या वक्री चालीमुळे कर्क राशीच्या लोकांना आर्थिक स्थैर्य लाभेल. व्यवसायात नफा मिळण्याचा योग येईल.कुटंबात शांतता नांदेल.

मकर राशीलाही शनीच्या वक्री चालीचा फायदा होणार आहे. मकर राशीच्या लोकांचे मित्रांसोबतचे संबंध चांगलेच मजबूत होतील. जीवनसाथीची मदत होईल.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.