
गुरु 3 महिने मृगशिरा नक्षत्रात राहील. गुरु 14 मे रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल. मृगशिरा नक्षत्रात गुरु ग्रहाचं 3 महिने वास्तव्य असणार आहे. याचा फायदा 4 राशीच्या लोकांना होणार आहे. या 4 राशी कोणत्या आहेत? हे जाणून घेऊयात. (Photo Credit : Tv9)

सिंह राशीच्या लोकांसाठी गुरु राशीतील बदल फायदेशीर राहील. सिंह राशीच्या लोकांना प्रगती करण्याची संधी मिळेल.पदोन्नती-पगारवाढ मिळू शकते. उद्योजकांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. भागीदारीत काम करणाऱ्यांना खूप फायदा होईल. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. (Photo Credit : Tv9)

तूळ राशीच्या लोकांना देखील याचे सकारात्मक परिणाम जाणवतील. या लोकांना त्यांच्या नोकरीत मोठे यश मिळू शकते. बेरोजगारांना नोकरी मिळेल. विद्यार्थ्यांचं परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. (Photo Credit : Tv9)

गुरु ग्रहाच्या संक्रमणामुळे धनु राशीच्या लोकांना फायदा होईल. मात्र यावेळेस धनु राशीवर शनीचा प्रभाव आहे. मात्र तरीही गुरुची कृपा लाभदायक ठरेल. समस्या दूर होतील. घरात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. (Photo Credit : Tv9)

कुंभ राशीतील लोकांचा शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. नवविवाहितांना अपत्य प्राप्तीबाबत गोड बातमी मिळू शकते. विदेशातील संबंधित व्यावसायिकांना फायदा होईल. (Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.) (Photo Credit : Tv9)