
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

आजचा दिवस आनंदात जाईल. दिवसभर उत्साह राहील. कुटुंबासोबत दिवस मस्त जाईल. कायदेशीर प्रकरणात यश मिळेल. शुभ अंक 55 आणि शुभ रंग निळा राहील.

कायदेशीर प्रकरणात अडचणी वाढतील. त्यामुळे दिवसभर टेन्शन राहील. मित्रांच्या सहकार्य लाभेल. पुढच्या दिवसासाठी प्लान करा. शुभ अंक 32 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

व्यवसायिकांना आजचा दिवस डोकेदुखी ठरेल. काही घडामोडी विचित्र घडतील. काही गोष्टींमुळे आर्थिक अडचण वाढेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग लाल राहील.

प्रत्येक योजना राबवताना काळजी घ्या. कारण एक चूक चांगलीच महागात पडू शकते. काम पूर्ण होईपर्यंत त्याकडे लक्ष ठेवा. शुभ अंक 28 आणि शुभ रंग जांभळा राहील.

आर्थिक स्थिती चांगली असताना बचत करणं गरजेचं आहे. वाईट काळात पैशांची मदत होईल. दिवसभर हवा तसा उत्साह राहणार नाही. त्यामुळे अस्वस्थ वाटेल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग हिरवा राहील.

काही कामासाठी कर्ज घेण्याची वेळ येईल. पण कर्ज घेणं टाळा. जमिनीचा व्यवहार करताना काळजी घ्या. धार्मिक कार्यात मन रमेल. कुटुंबाची जबाबदारी वाढेल. शुभ अंक 44 आणि शुभ रंग पिवळा राहील.

व्यवसायाच्या दृष्टीने भविष्याच्या योजना आखा. वेळेनुसार आपल्या स्वभावात बदल करणं गरजेचं असतं. नव्या लोकांशी भेटीगाठी होतील. शुभ अंक 10 आणि शुभ रंग हिरवा राहील.

समाजात मानसन्मान वाढेल. आपल्या चांगल्या स्वभावाचा फायदा होईल. तसेच इतरांकडून गरजेच्या वेळी मदत होईल. नोकरीच्या ठिकाणी तणाव असेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग पिवळा राहील.

आज काही घडामोडी विचित्र घडतील. ठरवलं काही वेगळं असेल घडेल काही वेगळं. मित्रांकडून मार्गदर्शन मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल काळ आहे. शुभ अंक 9 आणि शुभ रंग लाल राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)