Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 29 ऑक्टोबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे. प्रत्येक अंकावर ग्रहांचा वर्चस्व असतं. त्यामुळे ग्रह आणि अंकाच्या गणितानुसार तुमचा दिवस कसा जाईल? अंकाचं गणित रविवार 29 ऑक्टोबर रोजी कसं असेल? याबाबत जाणून घेऊयात.

| Updated on: Oct 28, 2023 | 10:55 PM
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10

ऑफिसमधल्या घडामोडींमुळे डोक्यावरील ताण वाढेल. त्यामुळे अतिरिक्त काम करावं लागेल. त्याचा तसा मोबदला मिळणार नसल्याने चिडचिड होईल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

3 / 10

आपण समाजात कसे वावरतो यावर सर्व काही अवलंबून असतं. त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवा. प्रवासादरम्यान काळजी घ्या. अपघात होईल अशी स्थिती ओढावून घेऊ नका. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

4 / 10

अहंकारामुळे आपलंच नुकसान होत असतं. पण त्यावेळेस ते आपल्याला कळत नसतं. त्यामुळे कोणाचं वाईट करण्याच्या भानगडीत पडू नका. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10

आपल्या कामाचा योग्य मोबदला आपल्याला वेळ आल्यावर मिळतो हे लक्षात ठेवा. देवाच्या काठीला आवाज नसतो. त्यामुळे काम करत राहा. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10

आपली आर्थिक स्थिती व्यवस्थित करण्यावर भर द्या. विनाकारण गरज नसलेल्या गोष्टींवर पैसा खर्च करू नका. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

7 / 10

कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. त्यामुळे दिवसभर अस्वस्थ राहाल. पण काळजी करू नका. आपल्या योजना योग्य पद्धतीने राबवा. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10

आपल्या आरोग्याची काळजी घ्या. घरचं टेन्शन घेऊन ते सुटणार नाही. त्यामुळे डोकं शांत ठेवा आणि कामं करत राहा. आर्थिक स्थिती या काळात खालावलेली राहील. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

9 / 10

जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे भुतकाळातील आठवणींना उजाळा मिळेल. बायकोसोबत असलेले वाद संपुष्टात येतील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10

आई वडिलांसोबत फिरण्याचा योग जुळून येईल. आजी आजोबांची साथ मिळेल. त्यामुळे कौटुंबिक वातावरण एकदम चांगलं राहील. मित्रांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us