
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

आजचा दिवस तुमचाच आहे असं समजा. चांगले पैसे हाती येतील. त्यामुळे योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी आहे.

एकटेपणामुळे आजचा दिवस व्यथित व्हाल. आत्मपरीक्षण करण्याची वेळ येईल. प्रवासाचा योग जुळून येईल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

घराच्या डागडुजीसाठी पैसा खर्च होईल. त्यामुळे पुरते हतबल होऊन जाल. त्यामुळे भविष्याचा विचार करून खर्चावर नियंत्रण मिळवा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

कौटुंबिक वादामुळे पुरते हैराण होऊन जाल. डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या बोलण्याने वाद वाढत जाईल हे लक्षात ठेवा. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

प्रवास करताना काळजी घ्या. लांबचा प्रवास शक्यतो टाळा. भावंडांमुळे तुम्हाला त्रासाला सामोरं जावं लागून शकतं. काही गोष्टी हातच्या राखून ठेवा. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

हाती घेतलेलं काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करा. थोडा त्रास होईल पण केलेल्या कामाचं योग्य फळ मिळेल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

कुटुंबाला आर्थिक गरज आहे हे लक्षात ठेवा. त्यानुसार जोखीम घ्या. उदार घेतलेल्या पैशांमुळे मानसिक त्रास होऊ शकतो. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

प्रिय व्यक्तीसोबत आजचा दिवस व्यतित कराल. त्यामुळे दिवस आनंदात जाईल. जेवण आणि चित्रपट पाहण्याचा आनंद लुटाल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

आजचा दिवस आत्मविश्वास दुणावलेला राहील. त्यामुळे कामं झटपट उरका. तसेच नवीन कामांसाठी सज्ज राहा. नवीन प्रॉपर्टी खरेदीचा योग जुळून येईल. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)