
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

आजचा दिवस विरोधकांवर विजय मिळवणारा राहील. गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. प्रेम प्रकरणात अपेक्षित यश मिळेल. विवाहाबाबत निर्णय घेऊ शकता. शुभ अंक 17 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

गेल्या आठवड्यात आलेल्या अडचणी दूर होतील. तसेच एखादी नवीन योजना या काळात राबवू शकता. मेहनतीचं योग्य फळ मिळेल. आत्मविश्वास या काळात वाढेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

आज दिवस आळसावलेला राहील. आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढू शकते. हाती घेतलेलं काम अर्धवट राहू शकते. कौटुंबिक स्तरावर काही कारणास्तव वाद होऊ शकतात. शुभ अंक 7 आणि शुभ रंग केसरी राहील.

आसपासच्या लोकांसोबत नम्र राहणं गरजेचं आहे. कधी कोणाची मदत पडेल सांगता येत नाही. दुसरीकडे खर्चावर नियंत्रण ठेवा. तसेच बचतीसाठी गुंतवणूक करा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग नारंगी राहील.

व्यवसायासाठी नवीन योजना आखा आणि त्या दृष्टीने पावलं उचला. गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. संध्याकाळी अस्वस्थ वाटू शकते. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पांढरा राहील.

कायदेशीर प्रकरणात यश मिळू शकते. तसेच गुप्तशत्रूंवर सहज मात कराल. तुमच्या कामावर वरिष्ठ खूश होतील आणि नवीन जबाबदारी सोपवली जाईल. जोडीदाराकडून गोड बातमी कानावर पडेल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळेल. मित्रांकडून उत्तम साथ लाभेल. वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला लाभ मिळू शकतो. शुभ अंक 11 आणि शुभ रंग लाल राहील.

मानसिक अस्वस्थता जाणवेल. विनाकारण कसलीतरी भीती वाटत राहिल. तसेच विनाकारण वाद होताना दिसतील. या कालावधीत शब्द जरा जपून वापरा. शुभ अंक 25 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

आज दिवस एकदम उत्साहात जाईल. आत्मविश्वास दुणावलेला राहील. भागीदारीच्या धंद्यात अपेक्षित यश मिळेल. कान, दात आणि गळ्याची काळजी घ्या. शुभ अंक 21 आणि शुभ रंग हिरवा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)