
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

आज कोणतंही काम करताना काळजी घ्या. झटपट निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आर्थिक फटका बसू शकतो. आरोग्य विषयक तक्रार जाणवेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

आजचा दिवस काही कामं होताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. उगाचच त्रागा करू नका. संयम ठेवा. कौटुंबिक स्तरावर वाद होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

वडिलांच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. रागावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. प्रेम प्रकरणात फटका बसू शकतो. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

वैवाहिक जीवनात उलथापालथ दिसून येईल. शांत राहणं गरजेचं आहे. आर्थिक गुंतवणूक करताना काळजीपूर्वक करा. मुलांकडून सकारात्मक गोष्टी घडताना दिसतील. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही घडामोडी घडताना दिसतील. बॉसच्या नाराजीमुळे अस्वस्थ व्हाल. न केलेल्या चुकांसाठी ओरडा खावा लागू शकतो. कौटुंबिक स्तरावर अडचणी निर्माण होतील. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

आजचा दिवस सकारात्मक घडामोडी घडतील. काही अनपेक्षित भेटीगाठी होतील. मित्रांसोबत जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. कायदेशीर प्रकरणात यश मिळेल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

तुमच्या वाणीचा प्रभाव इतरांवर पडताना दिसेल. वैवाहित जीवन एकदम आनंदी राहील. कुटुंबासोबत फिरण्याचा योग जुळून येईल. काही कारणास्तव पैसे खर्च करावे लागतील. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

प्रेम प्रकरणात तुम्हाला अपयश पदरी पडेल. विचार केला त्याच्या विरुद्धच घडामोडी घडतील. वैवाहित जीवन आनंदी राहील. जोडीदाराची तुम्हाला उत्तम साथ मिळेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

अडकलेली कामं पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस फलदायी ठरेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. गुप्तशत्रूंना मात द्याल. कायदेशीर प्रकरणात अपेक्षित यश मिळेल. घेतलेलं कर्ज फेडा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)