
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

आजचा दिवस एकदम आनंदात जाणार आहे. सकाळी उठल्यापासून सकारात्मक विचार ठेवून बाहेर पडा. हाती घेतलेली कामं पटापट होतील. शुभ अंक 22 आणि शुभ रंग पिवळा राहील.

आजचा दिवसात सकारात्मक घडामोडींचा सामना होईल. अनपेक्षितपणे काही घटना घडतील. त्यामुळे हे कसं शक्य आहे असा प्रश्न पडेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

आजचा दिवस संमिश्र घडामोडींचा राहील. काही निर्णय आपल्या बाजूने येतील. तर काही ठिकाणी पदरी निराशा पडेल. मुलांसोबत वेळ व्यतित करा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग हिरवा राहील.

आजचा दिवस ठरवलेल्या योजनांवर काम करा. उगाचच दुसऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करू नका. नाही तर एक ना धड भाराभार चिंध्या होतील. शुभ अंक 7 आणि शुभ रंग पांढरा राहील.

आपण कसं वागतो कसं बोलतो यावर समोरची व्यक्ती प्रतिसाद देत असते. त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवा. आपल्याकडून समोरच्याचा भावना दुखवणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

निसर्गाचे काही नियम असतात. आपण जे करू त्याच पद्धतीने आपल्याला मिळतं. त्यामुळे जितकी चांगली कामं करता येतील तितकी करण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग लाल राहील.

आपल्या घरात काही दोष असतील तर ते दूर करा. त्यामुळे आपल्या प्रगतीत बाधा येऊ शकते. मित्रांसोबत आपल्या काही समस्या शेअर करा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

आज नशिबाची उत्तम साथ मिळू शकते. गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. वाद होईल असं वागू नका. बचतीकडे लक्ष द्या. शुभ अंक 22 आणि शुभ रंग नारंगी राहील.

आजचा दिवस न्यायालयीन प्रकरणात गुंतागुंतीचा राहील. काही ठिकाणी नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. मोठा आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)