
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

आजचा दिवस आध्यात्मिक प्रगतीचा असेल. तुम्हाला आत्मिक समाधान लाभेल. त्याचबरोबर डोक्यावरील भारही हलका झालेला असेल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

लक्ष्य गाठण्यासाठी बुद्धिसोबत मनाची साथ मिळाली पाहीजे. आज द्विधा मनस्थिती राहील. पण लक्ष्य सोडू नका. वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. शुभ अंक 22 आणि शुभ रंग करडा राहील.

कोणतंही सामाजिक कार्य करण्यासाठी मनाची तयारी हवी. त्यामुळे समाजात मानसन्मान मिळतो. करायचं म्हणून करून काहीच उपयोग नाही. यासाठी समर्पण भाव असायला हवा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

आरोग्याकडे लक्ष केंद्रीत करा. जवळ असलेल्या पैशांची व्यवस्थितरित्या गुंतवणूक करा. काही गोष्टींकडे कानाडोळा केलेलंच बरं असतं. त्यामुळे वाद होत नाहीत. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

कोणत्याही कामासाठी परिश्रम घ्यावे लागते. कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. मित्र परिवाराकडून तुम्हाला मदत होईल. आर्थिक व्यवहार डोळेझाकपणे करू नका. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

नव्या विचारांची कास धरा. नव्या जगासोबत चालला तरच प्रगती साध्य करता येईल. नातेसंबंध टिकवण्यावर जोर द्या. आर्थिक नुकसानीमुळे मन चलबिचल होईल. महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी सल्ला घ्या. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

घाई गडबडीत कोणतंही काम करू नका. केलेल्या कामाचं मूल्यांकन करा. रिकाम्या वेळेत मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे निर्णय घेताना मदत होईल. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

प्रत्येक कामात उत्साह असणं गरजेचं आहे. त्यामुळे यश मिळवणं सोपं होतं. कौटुंबिक वाद बाजूला ठेवून कामाला लागा. विनाकारण वाद होईल असं वागू नका. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

कोणत्याही कामासाठी काही वेळ आवश्यक आहे. आताच्या आत काही कामं होत नाही. काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. मित्रांच्या भेटीगाठी घ्या आणि डोक्यावरील ताण दूर करा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)