
नवरात्रीत काय घालावं, काय घालून दांडिया-गरबा खेळायला जावं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल. तुम्ही रश्मिका मंदानाचा हा लूक ट्राय करू शकता. यात तिने हिरव्या रंगाचा लेहंगा आणि त्याच्या एकदम विरोधात जाणारा ब्लाउज घातलाय. दांडिया नाईटसाठी असा लूक उत्तम आहे. हेच तुम्ही वेगळ्या रंगात सुद्धा करू शकता.

मध्यंतरी रश्मिका मंदानाचा एक लूक खूप व्हायरल झाला होता. यात तिने एक मोठी बॉर्डर असणारी साडी नेसली होती. हेवी बॉर्डर, डिझाईन असलेला ब्लाउज आणि केस बांधलेले. तुम्ही सुद्धा अशी साडी नेसू शकता. यावर साजेसा मेकअप केल्यास तुम्ही खूप सुंदर दिसाल.

शिफॉन साडी खूप लोकप्रिय आहे. रश्मिका मंदानाने एका कार्यक्रमात पिंक कलरची शिफॉन साडी आणि लांब बाह्यांचा ब्लाउज घातला होता. सणवार असो किंवा पार्टी दोन्ही प्रकारांमध्ये ही साडी नेसली जाऊ शकते. तुम्हाला हवा तास मेकअप तुम्ही यावर करू शकता.

rashmika traditional look

तुम्हाला अंगरखा स्टाईल कुर्ती माहितेय का? ही कुर्ती कुठेही, अगदी कोणत्याही कार्यक्रमात घातली तरी छान दिसते. यावर तुम्ही ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी घालू शकता. साधा आणि सोबर लूक हवा असेल तर हा ड्रेस तुम्ही ट्राय करू शकता.