
मुंबईसोबतच देशभरात सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे सगळे कलाकार त्यांच्या घरीच आहेत. त्यातच या लॉकडाऊन दरम्यान, अनेक कलाकार महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडत आहेत. आज रवीना टंडन आणि फातिमा सना शेख यांना मुंबईत स्पॉट करण्यात आलं.

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon)ला आज मुंबईत स्पॉट करण्यात आलं, लॉकडाऊन दरम्यान ती एका क्लिनिकच्या बाहेर स्पॉट झाली. तिच्या श्वानाच्या उपचारासाठी तिनं क्लिनिकमध्ये हजेरी लावली होती.

तिच्या श्वानाची तब्येत काही दिवसांपासून खराब आहे.

आज फातिमा सना शेख देखील तिच्या श्वानाच्या उपचारासाठी तिथे पोचली होती.

फातिमा सना शेख येथे आपल्या श्वानासोबत खेळताना दिसली.

फातिमा सना शेखनं फोटोग्राफर्सशी बोलताना सांगितलं की बऱ्याच दिवसांपासून तिच्या श्वानाची तब्येत खराब आहे.