
देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात सोन्याच्या आणि चांदीच्या दराने नवा पुन्हा नवा विक्रम नोंदवला आहे

जळगावच्या सराफ बाजारात सोन्यामध्ये 900 रुपये आणि चांदी मध्ये 500 रुपयांची वाढ झाली असून सोन्या चांदीच्या दराने पुन्हा विक्रमी उच्चांकी गाठली आहे

सोन्याचे प्रति तोळा Gst सह दर हे 93 हजारांवर पोहोचले असून चांदी प्रतिकिलो 1 लाख 5 हजार रुपयांवर पोहोचली आहे.

2024 मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याचे दर हे 66 हजार रुपये होते. एकाच वर्षात सोन्याचे दरात तब्बल 25 ते 30 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना मोठा आणि चांगला परतावा मिळाला आहे.

सोन्या चांदीचे भाव विक्रमी असले तरी मात्र सोन्या चांदीच्या दरात विक्रीत मोठी वाढ झाली असून सुवर्णनगरीत गुढीपाडव्याला कोट्यावधींची उलाढाल झाल्याची माहिती सुवर्ण व्यवसायिकांनी दिली.

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डोनाल्ड ट्रम्प यांची पॉलिसी, रशिया युक्रेन युद्ध यासह इतर कारणांमुळेच सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं सुवर्ण व्यवसायिकांचं म्हणणं आहे.