आता लग्न करा अन् रितेश-जिनिलियासारखं..; आर्ची-परश्याच्या फोटोंवर भन्नाट कमेंट्स

'सैराट'मधली लोकप्रिय जोडी आर्ची आणि परश्या अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर नुकतेच एकत्र एका कार्यक्रमात उपस्थित राहिले. या दोघांची जोडी पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

| Updated on: May 10, 2026 | 1:43 PM
1 / 5
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' हा चित्रपट प्रदर्शित होऊन दहा वर्षे झाली तरी आजही तो प्रेक्षकांच्या सर्वांत आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. यामधील आर्ची आणि परश्या आता मोठे झाले असून आजही जेव्हा हे दोघं एकत्र येतात, तेव्हा कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडतो.

2 / 5
अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे नुकत्याच एका कार्यक्रमानिमित्त एकत्र दिसले. यावेळी रिंकूने गुलाबी रंगाचा सुंदर सूट परिधान केला होता. तर आकाश टी-शर्ट आणि जीन्स अशा कॅज्युअल लूकमध्ये दिसून आला. या दोघांनी पापाराझींसमोर फोटोसाठी एकत्र पोझ दिले. त्यांचे हेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3 / 5
रिंकूनेही आकाशसोबतचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. 'आम्ही भेटलो, आम्ही हसलो आणि आम्ही सहजच फोटो क्लिक केले' असं कॅप्शन देत रिंकूने आकाशसोबतचा हा खास फोटो शेअर केला. त्यावर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

4 / 5
'सैराटची ही जोडी आजही तितकीच याड लावणारी आहे. आर्ची आणि परश्या.. तुमची केमिस्ट्री नेहमीच झिंगाट आहे', असं एकाने लिहिलं. तर 'तुम्ही दोघांनी लग्न केलं पाहिजे', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. 'एकवेळ पिरॅमिट पुन्हा बांधता येईल, पण सैराटसारखा सिनेमा पुन्हा बनणार नाही', अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

5 / 5
कमेंट्समध्ये काहींनी रिंकू आणि आकाशला थेट लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. 'तुम्ही दोघं लग्न करा आणि रितेश-जिनिलियासारखी तुमची पण जोडी एक नंबर होईल', असं एकाने लिहिलंय. तर 'महाराष्ट्रात लफड्यांची संख्या वाढवणारी जोडी' अशी भन्नाट कमेंटही नेटकऱ्यांनी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us