
90 च्या दशकात जेव्हा बॉलिवूडमध्ये सोनम खानने पाऊल टाकलं, तेव्हा तिने आपला बोल्डनेस आणि सौंदर्याने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन सारख्या दिग्गजांसोबत सोनमने काम केलय. 'त्रिदेव' ची 'ओये-ओये गर्ल' आज वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही आपला फिटनेस आणि ग्लॅमरच्या बळावर तरुण अभिनेत्रींना टक्कर देत आहे.

53 वर्षांच्या सोनमने ज्या पद्धतीने स्वत:ला फिट ठेवलय ते प्रत्येकासाठी प्रेरणादायक आहे. सोनम खानच खरं नाव (बख्तावर खान) आहे. हिंदी सिनेमात तिला यश चोपडा यांनी 'विजय' चित्रपटातून (1988) साली लॉन्च केलेलं. त्यात तिच्यासोबत ऋषी कपूर होता. त्याआधी तिने 'दूर वादियों में कहीं' या चित्रपटात चाइल्ड एक्टर म्हणून काम केलेलं.

विजयनंतर सोनमने 'त्रिदेव', 'विश्वात्मा' आणि 'अजूबा' सारख्या हिट चित्रपटात काम केलं. आपल्या काळात सोनम तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लुक्ससाठी ओळखली जायची. 'तिरछी टोपी वाले' आणि 'ओये ओये' सारख्या गाण्यांनी तिला रातोरात स्टार बनवलं. मोठ्या पडद्यापासून लांब राहिल्यानंतरही सोशल मीडियावर आजही तिचे फोटो आणि फॅशन सेन्स सांगतं की, तिचा स्टाइल गेम ऑन पॉइंट आहे.

प्रसिद्ध डिझायनर अबूजानी-संदीप खोसला यांच्या एका आउटफिटमध्ये तिचं फोटोशूट याचा पुरावा आहे की, तिच्या ग्लॅमरसमोर वय फक्त एक नंबर आहे. ग्लॅमर सोबत सोनम खानचा फिटनेस सुद्धा चर्चेत असतो.

एकवेळ अशी आलेली की, सोनम खान चित्रपटांपासून लांब गेलेली. तिचं वजन खूप वाढलेलं. पण वयाच्या 50 व्या वर्षी तिने वेट लॉसची जी जर्नी सुरु केली, ती खरच कौतुकास्पद आहे. रिपोर्ट्सनुसार, लॉकडाऊनमध्ये उटीला असताना तिने एक संतुलित आणि शाकाहारी भोजनाला प्राधान्य दिलं. नियमाने डाएट फॉलो केलं. जवळपास 30 किलो वजन तिने कमी केलं.