140 रुपयांमध्ये देहविक्री करून… ट्रोलिंगवर पोलिसांची गाडी अडणारी रिया भडकली, सर्व काही सांगून टाकलं

Riya Ahir: आंदोलनानंतर ट्रोलिंग आणि धमक्यांना सामोरी गेलेल्या रिया अहिरने नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी तिने मोठा खुलासा केला आहे. आता रिया नेमकं काय म्हणाली? वाचा...

| Updated on: Aug 05, 2026 | 5:49 PM
1 / 5
दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या विद्यार्थांच्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशावर पाहायला मिळाले. मुबंईत देखील अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मुंबईत तरुणांचं आंदोलन सुरू असताना पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया अहिर प्रचंड प्रसिद्ध झाली आहे. सोशल मीडियातून रियाच्या या धाडसाचं कौतुक होत आहे. तसंच तिच्यावर टीकाही होत आहे. तिला ट्रोल केलं जात आहे. तसेच तिच्याविषयी नको नको ते बोलले जात आहे. आता रियाने राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सहभागी होऊन मोठे वक्तव्य केले आहे.

2 / 5
माध्यमांशी बोलताना रिया म्हणाली की, माझे नाव आहे रिया अहिर. मी ती मुलगी आहे जी मुंबई पोलिसांच्या समोर आली होती. तुम्ही असे म्हणत आहात की ही ती मुलगी आहे जी व्हायरल झाली आहे. जिने मुंबई पोलिसांना थाबवले. पण मी माध्यमांना सांगू इच्छिते की मी ती मुलगी आहे जिने 20 मुलांना अनलॉफुली डिटेन होण्यापासून वाचवले होते. कृपया तुमचा नरेटीव्ह बदला, तुमचा दृष्टिकोन बदला. पण मी जे काही केले त्यामुळे माझा छळ केला जात आहे.

3 / 5
पुढे ती म्हणाली, मी याला ट्रोलिंग म्हणणार नाही. कारण हे ट्रोलिंग नाहीये हा गुन्हा आहे. केवळ इतकेच नाही तर पक्षाचे कार्यकर्ते देखील सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. ते माझ्याविषयी चुकीचे बोलत आहेत.

4 / 5
मी जे काही करत आहे ते 140 रुपयांमध्ये देहविक्री करुन करत आहे असे ते म्हणत आहे. तुम्ही स्वत: विचार करा त्यांच्या डोक्यात किती घाण भरली आहे असे रिया म्हणाली.

5 / 5
27 तारखेला मी गुन्हा दाखल केला, आज 5 तारीख आहे माझ्या हाताता एफआयआरदेखील नाही. हे ना मुलींना शिकू देत आहेत ना मुलींना वाचवत आहेत. मी फक्त तुम्हाला इतकेच सांगू इच्छिते की ज्या विद्यार्थ्यांसाठी मी उभी होते ते माझ्यासाठी उभे आहेत. आपली देखील जबाबदारी आहे की आपण एकमेकांसाठी उभे राहायला हवे असे रिया पुढे म्हणाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us