
खोपोली पेण मार्गावर भीषण अपघात झाला आहे.

या अपघातात एक जण ठार झाला असून एक जण जखमी आहे

वळण व्यवस्थिन न मारता आल्यामुळे रिक्षाचा अपघात घडला.

यात रिक्षा पलटी झाली आणि त्यातच एकाचा मृत्यू झाला आहे.

खोपोली-पेण मार्गावरील रिशिवन हॉटेल जवळ हा भीषण अपघात झाला. याच रिक्षाचंही मोठं नुकसान झालंय.

या अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

वाहनांच्या लांबच लांब रांगा या अपघातामुळे दोन्ही मार्गावर लागल्या होत्या.