AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद यांनी मुलांना दिली सर्वांत मोठी संपत्ती… वडिलांकडून मिळालेला वारसा आयुष्यभर जपला आणि…

Dharmendra Property : धर्मेंद्र यांनी स्वतःची ओळख निर्माण केली... पण वडिलांकडून मिळालेला वारसा आयुष्य जपला आणि मुलांकडे सोपावला... धर्मेंद्र यांनी मुलांनी दिली आणि सर्वांत मोठी संपत्ती... सध्या सर्वत्र धर्मेंद्र यांची चर्चा...

धर्मेंद यांनी मुलांना दिली सर्वांत मोठी संपत्ती... वडिलांकडून मिळालेला वारसा आयुष्यभर जपला आणि...
Actor Dharmendra
| Updated on: Dec 08, 2025 | 2:41 PM
Share

Dharmendra Property : बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते आणि ही – मॅन म्हणजेच अभिनेते धर्मेंद्र याचं 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झालं. मृत्यूपूर्वी काही दिवस धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना रुग्णालायातून डिस्चार्ज देखील मिळाला. घरी आल्यानंतर धर्मेंद्र यांच्या 90 व्या वाढदिवसाची सर्वांनी तयारी सुरु केली… 8 डिसेंबर म्हणजे आजच धर्मेंद्र यांचा वाढदिवस आहे… आता धर्मेंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबियांना कार्यक्रमाचं आयोजन मुंबईत केलं आणि चाहत्यांना देखील आमंत्रण दिलं आहे.

धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर रोजी झाला. सिनेमांव्यतिरिक्त, ते नेहमीच कुटुंब, प्रेम आणि मूल्यांबद्दल बोलताना दिसले. जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळायची तेव्हा ते त्यांच्या आई – वडिलांच्या आठवणी ताज्या करायचे. एका जुन्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आई – वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हटले की आज ते जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे.

वडिलांकडून धर्मेंद्र यांना मिळालेला वारसा…

एका मुलाखतीत धर्मेंद्र यांनी आई – वडिलांसाठी लिहिलेली एक कविता ऐकवली आणि म्हणाले, ‘माझ्या वडिलांनी एक कडुलिंबाचं झाड लावलं होतं, जे आता दाट झाड झालं आहे आणि जेव्हा जेव्हा मला माझ्या वडिलांची आठवण येते तेव्हा मी त्या कडुलिंबाच्या झाडाखाली जातो आणि बसतो… तेव्हा वडील माझ्या जवळच आहेत असा भास मला होतो… ‘धरम… मी तुझ्या जवळ आहे…’ ते असं बोलतात…’ असं मला जाणवतं…

धर्माबद्दल केलं मोठं वक्तव्य

धर्मेंद्र म्हणाले, माझ्या आई – वडिलांनी नेहमीच माझ्यात मानवतेचा मंत्र रुजवला आणि त्यांची मूल्ये हीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. मी हेच ताबीज आणि संपत्ती माझ्या मुलांना दिली आहे आणि त्यांनीही ती त्यांच्या मुलांना दिली आहे. आम्हाला धर्माबद्दल शिकवलं गेलं नाही, फक्त चांगले मूल्य शिकवले… असं देखील धर्मेंद्र म्हणाले. हाचं तो वारसा आहे, जो धर्मेंद्र यांनी पुढच्या पिढीला सोपावला आहे.

धर्मेंद्र यांचं वैवाहिक आयुष्य

धर्मेंद्र यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांना चार मुलं देखील आहेत. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत 1980 मध्ये लग्न केलं… धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना दोन मुली आहे. धर्मेंद्र यांनी दुसरा संसार थाटल्यानंतर हेमा मालिनी आणि प्रकाश कौर कधीच समोरा-समोर आल्या नाहीत.

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.