10 वर्षाच्या मुलाचं नशीब पालटलं, रोहित शर्माच्या गुरूंनी केलं असं काही… तुम्हीही कराल कौतुक

सोलापूरच्या वनराज पोळ या युवा क्रिकेटपटूला रोहित शर्माचे प्रशिक्षक, द्रोणाचार्य दिनेश लाड यांनी दत्तक घेतले आहे. वनराजच्या असामान्य टॅलेंटने प्रभावित होऊन लाड सरांनी त्याला मुंबईत मोफत क्रिकेट प्रशिक्षण देण्याची जबाबदारी उचलली.

| Updated on: Nov 19, 2025 | 4:35 PM
1 / 10
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील दहा वर्षीय वनराज पोळ याचे क्रिकेटमधील असामान्य टॅलेंट पाहून त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू रोहित शर्मा याचे प्रशिक्षक तसेच 'द्रोणाचार्य' पुरस्कार विजेते दिनेश लाड यांनी दत्तक घेतले आहे.

2 / 10
दिनेश लाड यांनी वनराजला मुंबई येथे मोफत प्रशिक्षण देऊन त्याला मोठा खेळाडू बनवण्याची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील वनराज पोळ याचे वडील सुधीर पोळ हे सामाजिक वनीकरण विभागात वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत.

3 / 10
वनराजला लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती. त्याची खेळाची पद्धत आणि फूटवर्क पाहून वडिलांनी त्याला भोर येथे विश्वजित तारू आणि चिखलठाण येथे रवी निंबाळकर यांच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठवले.

4 / 10
मात्र, क्रिकेट खेळाचा मोठा खर्च वडिलांना पेलवत नव्हता. याच दरम्यान, सुधीर पोळ यांच्या पाहण्यात दिनेश लाड यांची एक मुलाखत आली. दिनेश लाड यांनी घडवलेले खेळाडू: रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर, सिद्धेश लाड, हरमनप्रीत सिंग, सुवेद पारकर अशा अनेक नामांकित खेळाडूंना लाड सरांनी स्वतः कष्ट घेऊन घडवले आहे.

5 / 10
लाड सर केवळ प्रशिक्षणच देत नाहीत, तर अनेक होतकरू खेळाडूंच्या राहण्या-खाण्याचा व शिक्षणाचा खर्चही उचलतात. हे ऐकून सुधीर पोळ यांना खात्री झाली की वनराजच्या प्रतिभेला दिनेश लाड न्याय देऊ शकतील. त्यांनी तात्काळ दिनेश लाड यांच्याशी संपर्क साधून वनराजच्या खेळाचे व्हिडीओ त्यांना पाठवले.

6 / 10
हे व्हिडीओ पाहिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी दिनेश लाड यांचा सुधीर पोळ यांना फोन आला. तुमचा मुलगा अतिशय सुंदर क्रिकेट खेळतो, त्याला मुंबईला घेऊन या, असे लाड सरांनी सांगितले.

7 / 10
वनराजला घेऊन मुंबईला गेल्यानंतर त्याचा खेळ पाहून दिनेश लाड खूपच प्रभावित झाले. त्याच क्षणी त्यांनी सुधीर पोळ यांना सांगितले की, "मी वनराजला दत्तक घेत आहे. त्याला चांगला खेळाडू बनविण्याची जबाबदारी माझी आहे. त्याला माझ्याकडे राहू द्या."

8 / 10
दिनेश लाड यांनी वनराज पोळला बोरिवली येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. सध्या वनराज पोळ मुंबईत दिनेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवत आहे. वनराजचे वडील सुधीर पोळ आणि चिखलठाण येथील ग्रामस्थांनी प्रशिक्षक दिनेश लाड यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

9 / 10
"लाड सर मागील ३० वर्षांपासून लहान मुलांना प्रशिक्षण देत आहेत, पण त्यांनी आजपर्यंत कोणत्याही मुलांकडून फी घेतली नाही. आजवर त्यांनी २२ मुले दत्तक घेतली असून सर्वांचे मुंबईत राहणे, शाळेचे शिक्षण, किराणा आणि क्रिकेट बॅट अशा सगळ्या गोष्टी ते मोफत देत आहेत. दिनेश लाड सर आमच्यासाठी माणसातील देव आहेत." असे सुधीर पोळ म्हणाले.

10 / 10
करमाळा तालुक्यातील एका सामान्य कुटुंबातील वनराज पोळला आता द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभल्याने तो भविष्यात एक यशस्वी क्रिकेटपटू बनेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.