
गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये सौम्य laxative गुणधर्म असतात. ज्यामुळे बद्धकोष्ठता कमी करण्यात आणि पचनशक्ती सुधारण्यात मदत होते. शिवाय गुलाबाच्या पाकळ्या उष्णता कमी करून शरीर थंड ठेवतात..विशेषतः उन्हाळ्यात गुलकंद किंवा गुलाबाचे पाणी फायदेशीर.

गुलाबाच्या पाकळ्या त्वचेसाठी लाभदायक आहेत. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C असल्यामुळे त्वचेची चमक वाढते. त्वचेला ओलावा मिळवून देऊन anti-aging प्रभाव देते.

गुलाबाच्या पाकळ्या तणाव, चिंता कमी करण्यात मदत करतात. गुलाबाचा सुगंध व त्यातील नैसर्गिक घटक mood-enhancer म्हणून काम करतात. ज्यामुळे मनःशांती मिळते आणि झोप सुधारते.

गुलाबाच्या पाकळ्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतात. गुलाबातील घटक गर्भाशयाला शिथिल करतात.पाळीतील cramps, चिडचिड आणि थकवा कमी होतो.

गुलाबाच्या पाकळ्या तोंड स्वच्छ ठेवतात आणि ताजेपणा देतात. गुलाबाच्या पाकळ्यांचा चहा (Rose Tea) चयापचय सुधारतो. गुलाबाच्या पाकळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे सूज कमी करण्यास मदत होते...