थलपतीच्या आयुष्यातील ती अभिनेत्री कोण? नम्रता शिरोडकरने महेश बाबूलाही रंगेहात पकडलं होतं तिच्याच सोबत
सध्या सर्वत्र दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता थलपती विजयच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. विजयचे एका अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचा दावा करत पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. याच अभिनेत्रीचे महेश बाबूसोबत अफेअर असल्याचे देखील म्हटले होते. महेशव बाबूची पत्नी नम्रता शिरोडकरने दोघांना रंगेहात पकडलं होतं.

सध्या सगळीकडे दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता थलपती विजयच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. थलपती विजयचे बाहेर अफेअर असल्यामुळे त्याच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. आता ही अभिनेत्री कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या अभिनेत्रीने सुपरस्टार महेश बाबूसोबत देखील अफेअर होते. पण मेहश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकरला याबाबत माहिती मिळताच तिने दोघांना एकदा रंगेहात पडकले होते. आता याच अभिनेत्रीचे विजयसोबत अफेअर असल्याचे समोर आले आहे.

तमिळ सिनेमाचे सुपरस्टार थलपती विजय पुन्हा एकदा खासगी आयुष्यातील वादात अडकला आहे. त्याची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी चेंगलपट्टू फॅमिली कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. या याचिकेत तिने पतीवर फसवणूकीचा गंभीर आरोप केला आहे. याचिकेत नाव न घेता एखाद्या 'अभिनेत्री'सोबत संबंध असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ही अभिनेत्री कोण असा प्रश्न पडला आहे.

ही अभिनेत्री त्रिशा कृष्णन असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. नेटकऱ्यांनी विजय आणि त्रिशाचे जुने फोटो आणि व्हिडीओ शेअर करून जोडप्याच्या कथित संबंधांबाबत अंदाज लावला आहे.

गीता कृष्णा यांनी एका मुलाखतीमध्ये महेश बाबूच्या गुप्त अफेअरवर टिप्पणी केली हो. त्याचे अभिनेत्री त्रिशासोबत अफेअर होते. तसेच हे प्रेमसंबंध गुप्त होते असा देखील खुलासा गीता कृष्णा यांनी केला. ‘महेश बाबू आणि त्रिशा मुंबईमध्ये गुप्तपणे भेटत असत. एकेदिवशी महेश बाबूची पत्नी नम्रताला या प्रकरणाचा छडा लागला. त्यानंतर नम्रताने हुशारीने हा प्रश्न सोडवला’, असे गीता कृष्ण म्हणाल्या. “आगीशिवाय धूर येत नाही” असे आपण अनेकदा ऐकतो. म्हणून, त्यात काही सत्य असले पाहिजे, असे निर्मात्याचे मत आहे. यामुळे महेश-तृषाचे अफेअर पुन्हा चर्चेत आले आहे.

संगीताने याचिकेत दावा केला आहे की, विजयने भावनिकदृष्ट्या त्यांच्यापासून अंतर ठेवले आहे आणि लग्नाबाह्य संबंध ठेवले आहेत. रिपोर्ट्सनुसार, संगीता बरीच वर्षे मुलीच्या दिव्या साशाच्या शिक्षणासाठी लंडनमध्ये राहत आहेत, तर विजय चेन्नईमध्ये व्यस्त आहेत. हे पहिल्यांदाच नाही जेव्हा विजयचे नाव त्रिशासोबत जोडले गेले आहे. २००४ मध्ये 'घिल्ली'पासून सुरू झालेल्या त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने 'थिरुपाची', 'आठी', 'कुरुवी' आणि २०२३ चा 'लियो' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपट एकत्र दिले. फॅन्स त्यांना आयकॉनिक जोडी मानतात.

वाद तेव्हा अधिक तीव्र झाला जेव्हा त्रिशाने जून २०२४ मध्ये विजयच्या वाढदिवसानिमित्त सेल्फी शेअर केला. त्यात हार्ट, इन्फिनिटी आणि नजराचे इमोजी होते. डिसेंबर २०२४ मध्ये कीर्ती सुरेशच्या लग्नासाठी दोघे गोव्यात गेले होते, जिथे प्रायव्हेट एअरपोर्टची छायाचित्रे व्हायरल झाली. नेटिझन्सनी त्रिशाच्या एका पोस्टमध्ये विजयचे शूज असल्याचा कथित क्लू शोधला.