
'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

ती नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन फोटोशूट शेअर करत असते. आता तिनं एक नवं फोटोशूट केलं आहे.

रुपाली अंकित मगरेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघं नेहमीच नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.

आता सध्या रुपालीचे लाल लेहेंग्यातील काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

नुकतंच पार पडलेल्या ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ सोहळ्यात रुपालीची हटके झलक पाहायला मिळाली. या लूकमध्ये रुपाली अगदी हटके आणि नवरीसारखी दिसली. आता याच लूकमध्ये तिनं आणखी मस्त फोटोशूट केलं आहे. हे फोटो तिनं तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.