
पावसाळा म्हणजे नवचैतन्य देणारा ऋतू... पावसाळ्यात निसर्ग अधिक ताजातवाना वाटतो. अशा या मन प्रफुल्लित करणाऱ्या ऋतूमध्ये महाराष्ट्र निसर्ग सौंदर्याने नटलेला दिसतो. अन् महाराष्ट्राचा ग्रामीण भाग तर अधिकच प्रसन्न दिसतो.

महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोग्राफर रोशनी शाह यांनी टिपलेले हे फोटो महाराष्ट्रा पर्यटन विभागाच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेत.

पावसाळा सुरु झाला की शेतात पेरणीची कामं सुरु होतात. शेतात बैलांच्या घुंगरांचा आवाज घुमू लागतो. चहू बाजूला पसरलेली हिरवळ अन् त्यात राबत असणारा बळीराजा.... हे दृश्य मनाल सुखावणारं आहे.

हे सगळे फोटो पाहिले की 'ओढ लावती अशी जीवाला गावाकडची माती' या ओळी आपोआपच ओठांवर येतात. गावच्या घरातून कौलावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचा आवाज, ओसंडून भरणाऱ्या नद्या- तलाव... हे सारं अनुभवायचं असेल तर गावी एकदा जायलाच हवं.

ओंकार पाटील यांनी टिपलेले हे खास फोटोदेखील महाराष्ट्र पर्यटन विभागाने सोशल मीडियावर शेअर केलेत. साधेपणात दडलेलं गावचं गावपण दाखवणारे हे खास फोटो...