AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवृत्त कधी होणार? थेट प्रश्नावर सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारोहात सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांच्या निवृत्तीच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. निवृत्त कधी होणार, याबाबत त्यांनी सांगितलं. या क्रार्यक्रमाला अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित होते.

निवृत्त कधी होणार? थेट प्रश्नावर सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?
Mohan BhagwatImage Credit source: Youtube
| Updated on: Feb 08, 2026 | 12:09 PM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात निवृत्तीबद्दल विधान केलं. “कार्यापासून निवृत्ती कधी होत नाही. मरेपर्यंत काम करणारी लोकं आहेत. शरीर चालतं तोपर्यंत काम करतात. वयाच्या पंच्याहत्तरीनंतर विना दायित्त्वाचं काम केलं पाहिजे, असं आम्ही मानतो. त्याला संघाची परवानगी मिळाली तर होईल,” असं उत्तर त्यांनी दिलं. यावेळी भागवत यांनी आरएसएस प्रमुख कोण होऊ शकतं, याबद्दलही मोठं वक्तव्य केलं. आरएसएस प्रमुख कोणत्याही जातीचा नसावा. ब्राह्मण, क्षत्रिय किंवा इतर कोणत्याही जातीचा असणं आवश्यक नाही, फक्त अट अशी आहे की नियुक्त केलेली व्यक्ती हिंदू असावी, असं त्यांनी स्पष्ट केलं.

निवृत्ती कधी?

“माझं सांगायचं झालं तर मला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. मी कार्यकर्त्यांना म्हणालो, झालं आता. ते म्हणाले, तुम्हाला काय झालं? फिरत आहात. काम करा अजून. त्यामुळे मी थांबलो. मी इथे असावं ही माझी इच्छा नाही. कार्यकर्त्यांची राहत नाही. मी या ठिकाणी राहू नये हा माझा ऑप्शन नाही. हा संघाचा ऑप्शन आहे. त्यामुळे संघ जेव्हा सांगेल तेव्हा दायित्वातून निवृत्ती होते. कार्यातून निवृत्ती नाही. दायित्त्वातून निवृत्ती झाली तरी कार्य सुरूच राहतं. शरीराची सक्रियता असेपर्यंत काम सुरू राहतं. निवृत्तीची वयोमर्यादा नाही. एखादी व्यक्ती जेव्हा म्हणतो मला निवृत्त व्हायचं आहे, तेव्हा कारण पाहून निवृत्ती दिली जाते. कुणाला निवृत्त करावं कधी, अशी वेळ आली नाही. अशी वेळ येऊ नये ही इच्छा आहे,” असं भागवत पुढे म्हणाले.

मोहन भागवत यांनी मुंबईत आयोजित आरएसएस शताब्दी समारंभात हे वक्तव्य केलं. या कार्यक्रमात अनेक प्रमुख व्यक्तींनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी इंग्रजी भाषेच्या वापराबद्दलही आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं की त्यांना इंग्रजी भाषेवर कोणताही आक्षेप नाही. आम्हाला भारतीय लोकांमध्ये काम करायचं आहे. आमचा कोणत्याही भाषेशी झगडा नाहीये. आपण जे आहोत ते आम्हाला बनून राहायचं आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार