यालाच म्हणतात मित्र, रशियाने भारताला दिले मोठे वचन, पुतिन यांचे थेट आश्वासन..
भारत आणि रशियाचे संबंध चांगले राहिले आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठे निर्बंध अमेरिकेने लावले. त्यातच आता रशियाने पुन्हा एकदा अमेरिकेला मोठा धक्का दिला.

भारत आणि रशियातील संबंध काय आहेत, हे सांगण्याची गरज नाही. ज्या ज्यावेळी भारत संकटात सापडला, त्याप्रत्येक वेळी भारताची साथ रशियाने दिली. त्यातच आता भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सोमवारी मॉस्को येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली.

यादरम्यान पुतिन यांनी भारताला वचन देत म्हटले की, रशिया भारताच्या कोणत्याही अडचणीमध्ये भारतासोबत असणार आहे. पुतिन यांनी यादरम्यान म्हटले की, भारत आणि रशियात मोठी उलाढाल झाली. हे पाहून मला आनंद झाला.

पुतिन यांनी म्हटले, मी तुम्हाला विनंती करेन की, पंतप्रधान मोदींपर्यंत माझ्या शुभेच्छा पोहोचवाव्यात. शांघाय सहकार्य संघटनेच्या चौकटीत ठरल्याप्रमाणे त्यांची लवकरच अतिशय लवकर भेट होईल.

भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असेही पुतिन यांनी म्हटले. आम्ही या पुरवठ्यात वाढ करत आहोत आणि भविष्यातही तसे करणे सुरू ठेवण्यास सज्ज आहोत.

भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता भारतावर मोठा दबाव आहे. भारतावर मोठा टॅरिफही अमेरिकेने लावला. मात्र, भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली.