AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रचंड वादग्रस्त गाणं, शब्द ऐकून हनी सिंग देखील संतापलेला, पण बिपाशाच्या डान्सने गाणं ठरलं सुपरहिट

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील आयटम साँग, जे गुलझार यांच्या शब्दांमुळे सापडलं होतं वादाच्या भोवऱ्यात. या गाण्याचे शब्द ऐकून हनी सिंग देखील संतापलेला. पण बिपाशा बासूच्या ठुमक्यांनी गाणं झालेलं सुपरहिट.

| Updated on: Aug 25, 2026 | 3:02 PM
Share
बॉलिवूडच्या इतिहासात अनेक अजरामर गाणी देणारे ज्येष्ठ गीतकार गुलजार यांच्या लेखणीची जादू आजही कायम आहे. ‘तेरे बिना जिंदगी से’, ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’, ‘छैंया छैंया’ आणि ऑस्करविजेते ‘जय हो’ यांसारख्या गाण्यांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

1 / 5
मात्र, सुमारे दोन दशकांपूर्वी त्यांच्या एका गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या विशाल भारद्वाज यांच्या ‘ओमकारा’ चित्रपटातील ‘बिडी जलाईले जिगर से पिया’ हे गाणं त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झाले.

2 / 5
गुलजार यांनी लिहिलेल्या या गाण्याच्या काही बोल्ड शब्दांवरून समाजातील एका वर्गाने आक्षेप घेत अश्लीलतेचा आरोप केला होता. दुसरीकडे, ग्रामीण बोलीभाषेचा प्रभावी वापर आणि रूपकात्मक शब्दरचनेसाठी सिनेसमीक्षकांनी या गाण्याचे कौतुक केले.

3 / 5
हे गाणं बिपाशा बासूच्या जबरदस्त नृत्यामुळे  विशेष गाजले. सैफ अली खान आणि विवेक ओबेरॉय यांचीही या गाण्यातील उपस्थिती लक्षवेधी ठरली. विशेष म्हणजे, आपल्या गाण्यांमधील बोल्ड शब्दांमुळे अनेकदा चर्चेत राहिलेल्या हनी सिंगनेही गुलजार यांच्या या गाण्याचा दाखला देत समाजाच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला होता.

4 / 5
‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या जुन्या मुलाखतीत त्याने गुलजार यांच्या गाण्यातील काही बोल्ड शब्दांचा उल्लेख करताना म्हटले होते की, दिग्गज गीतकार असे शब्द लिहितात तेव्हा त्यावर फारसा आक्षेप घेतला जात नाही; मात्र त्याच प्रकारची भाषा हनी सिंगच्या गाण्यांत आली की त्याला लक्ष्य केले जाते.

5 / 5
Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल

कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला

साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट