Sachin Pilgaonkar: सचिन पिळगांवकर झाले ‘डॉक्टर’; महागुरूंचा विशेष सन्मान, नेमकं कारण काय?

Sachin Pilgaonkar Doctorate: मराठी ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांना एक खास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

| Updated on: Nov 22, 2026 | 2:26 PM
1 / 5
गेली सहा दशके हिंदी, मराठी आणि इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने, दिग्दर्शनाने, गायनाने आणि अष्टपैलू कलागुणांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते सचिन पिळगांवकर यांना आता एक मोठा सन्मान मिळाला आहे.

गेली सहा दशके हिंदी, मराठी आणि इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने, दिग्दर्शनाने, गायनाने आणि अष्टपैलू कलागुणांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते सचिन पिळगांवकर यांना आता एक मोठा सन्मान मिळाला आहे.

2 / 5

सचिन पिळगांवर यांनी आपली प्रदीर्घ कारकीर्द, कलाक्षेत्रातील अतुलनीय योगदान याच्यामुळे त्यांना हा विशेष पुरस्कार देण्यात आला आहे. ते आता डॉक्टर बनले आहेत.

3 / 5

ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांना ITM युनिव्हर्सिटी, ग्वाल्हेर यांच्याकडून मानाचा डॉक्टर ऑफ लिट्रेचर (D.Litt. Honoris Causa) हा सन्मान नुकताच देण्यात आला आहे.

4 / 5

आयटीएम युनिव्हर्सिटी, ग्वाल्हेरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही सचिन पिळगांवकर यांना डॉक्टर ही पदवी देत असल्याचे समजत आहे. युनिव्हर्सिटीने 21 नोव्हेंबर रोजी दीक्षांत समारंभात सचिन यांचा सन्मान केल्याचे समजत आहे.

5 / 5

सचिन पिळगांवकरांना मिळालेली डॉक्टरेट ही वैद्यकीय पदवी नसून त्यांचा सन्मान आहे. हा सन्मान म्हणजे फक्त एका महान कलाकाराचा गौरव नाही, तर सहा दशकांच्या अविरत कलासाधनेचे ते कोतुक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us