AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिलिमिटेशनवरील सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनील तटकरे यांचं भाष्य; म्हणाले, शरद पवारांचे खासदार कुठे जातील…

sunil tatkare : डिलिमिटेशनवरील सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनील तटकरे यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांची भूमिका स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.

डिलिमिटेशनवरील सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनील तटकरे यांचं भाष्य; म्हणाले, शरद पवारांचे खासदार कुठे जातील...
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 22, 2026 | 2:26 PM
Share

संसदेच्या येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात डिलिमिटेश विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता आहे.  डिलिमिटेश बिल आल्यावर भूमिका स्पष्ट करू, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. सुप्रिया सुळे यांच्या विधानावर सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी भाष्य केलं. त्यांनी यावेळी सुप्रिया सुळे यांची भूमिका स्वागतार्ह असल्याचे त्यांनी म्हटलं.

डिलिमिटेशन विधेयकावरून खासदार फुटीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सर्व घडामोडींवर तटकरे म्हणाले, ‘सुप्रिया सुळेंनी  डिलीमीटेशन बिल आल्यावर भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. समान जागा वाढल्यास त्याला आमचा पाठिंबा असेल, असे त्यांनी सांगितलं आहे. खरंतर लोकशाहीतील महत्त्वाच्या गाभ्याच्या अनुषंगाने त्यांचं वक्तव्य स्वागतार्ह आहे. पवारांचे खासदार कुठे जातील त्याबाबत वक्तव्ये दुर्दैवी असून कपोलकल्पित आहे’.

आनंदराज आंबेडकर यांच्या विधानावर तटकरे म्हणाले, ‘हे अत्यंत निषेधार्ह वक्तव्य, याचा जाहीर शब्दात धिक्कार. लोकशाहीत मतमांडायचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र अजितदादांचं महाराष्ट्रासाठी योगदान आहे. त्यांच्या निधनाने देश हळहळला,असं असताना केलेलं वक्तव्य दुर्दैवी आहे. आनंदराज आंबेडकर महायुतीतले घटक असले तरी त्यांचं वक्तव्य अयोग्य आहे’.

डिलिमिटेशन विधेयकासाठी खासदार फोडण्यासाठी 150 कोटींचा आकडा ठरला आहे, यावर तटकरे म्हणाले, ‘आपलं अपयश झाकायला दुसऱ्यांना दोष दिला जातो. राऊतांचं वक्तव्या वैफल्यातून करण्यात आलं. त्यांचे खासदार किती फुटले, बाजूला का गेले आत्मचिंतन करावं’. तर एकनाथ शिंदेंनी शरद पवार गटाच्या आमदाराची भेट घेतली. त्यावर तटकरे म्हणाले,  शिंदे राज्याचे नेते, उपमुख्यमंत्री आहेत. ते दौऱ्यावर असताना कोणीही त्यांना भेटू शकतात. ते विकास कामं सांगण्यासाठी भेटतात. मात्र याचा राजकीय अन्वयार्थ काढणं चुकीचं आहे.

Follow Us
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा...
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा सुकल्या, रेशीम उत्पादक संकटात
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी..
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी सांगितली मनातील गोष्ट
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही..
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही संकटात; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन..
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन 3450 रुपये दर
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदार..
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदारांचा हिशोब द्या! नंतर...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना...
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना संभाजी पाटील निलंगेकरांचे जोरदार प्रत्युत्तर
अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
संजय राऊतांचा खळबळजनक दावा! अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी...
Vilas Londhe : टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी स्पष्ट केली भूमिका