
अभिनेते सुमीत राघवन आणि अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी देखील मतदानाचा हक्क बजालला आहे. विलेपार्ले येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील आता समोर आले आहेत

अभिनेता जॉन अब्राहम याने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. आई - वडिलांसोबत अभिनेत्याने मतदान केलं आहे. अभिनेत्याला मतदान केंद्रावर आई - वडिलांसोबत स्पॉट करण्यात आलं...

अभिनेता अक्षय कुमार याने मतदानाचा हक्क बजावताना दिसत. भारताना नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय नियमित मतदानाचा हक्क बजावला दिसतो. यावेळी त्याने सर्वांना देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन केलं.

अभिनेता सुनिल शेट्टी याने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्याने चाहत्यांसोबत सेल्फी क्लिक केले आणि सर्वांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन देखील केलं.

अभिनेता आमिर खान याची दुसरी पत्नी किरण राव हिने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. किरण हिचा देखील मतदान केंद्रवरील फोटो व्हायरल होत आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आज मुंबईत सहकुटुंबाचा मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सचिन तेंडुलकरने नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे. सचिन याने कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. ते मुंबईत मतदान करण्यासाठी पुण्याहून आले होते. तीन तास प्रवास करून त्यांनी मुंबई मतदानाचा हक्क बजावला आहे..