
आदिपुरुष चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून सैफ अली खान हा चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे अजिबात प्रमोशन हे सैफ अली खान याने केले नाहीये. आदिपुरुष चित्रपट आजच रिलीज झालाय.

आदिपुरुष चित्रपटामध्ये सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. मात्र, सैफ अली खान याच्या भूमिकेची खिल्ली उडवली जात आहे. अनेकांनी सैफला टार्गेट करण्यास सुरूवात केलीये.

आदिपुरुष चित्रपट रिलीज झाल्यानंतर सैफ अली खान ट्विटरवर टॉप ट्रेंड होताना दिसत आहे. सैफ अली खान याचा चित्रपटातील लूक पाहून अनेकांनी भडास काढल्याचे देखील बघायला मिळत आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बऱ्याच लोकांनी सैफ अली खान याच्या लूकची खिल्ली उडवली आहे. प्रभासच्या लूकचे काैतुक होत असताना सैफचा लूक लोकांना अजिबात नाही आवडला.

एकाने पोस्ट शेअर करत म्हटले की, मॉडर्न रावण नाही पाहिजे होता. दुसऱ्याने लिहिले की, रावण पाहून भीती वाटत नाही तर हसू येत आहे मला तर.