सैराट 2 येणार! नागराज मंजुळेने अर्ची आणि पश्याविषयी सांगूनच टाकलं

गेल्या काही दिवसांपासून नागराज मंजुळे यांचा सैराट 2 हा सिनेमा येणार की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता नागराज मंजुळे यांनी स्पष्ट सांगितले आहे.

| Updated on: Jul 10, 2026 | 3:11 PM
1 / 5
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय हिट ठरलेला सिनेमा म्हणून सैराट ओळखला जातो. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटातून रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. आता या चित्रपटाचा सीक्वल येत असल्याचे समोर आले आहे.

2 / 5
सैराट या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले. त्यांनी नुकताच स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीमध्ये आगामी सिनेमांविषयी खुलासा केला आहे. त्यावेळी त्यांनी सैराट सिनेमाच्या सिक्वलविषयी देखील सांगितले.

3 / 5
"मी सैराटसारख्या फिल्मकडे कधीच एक आव्हान म्हणून पाहिलेलं नाहीये. मला जे काही सांगायचे होते, ते मी फिल्ममधून मांडले आहे. सहसा आपल्याला असं वाटतं असतं की, सगळ्या लव्ह स्टोरीचा शेवट हा 'हॅपी एंडिंग'नं होतो, पण तसं नसतं. त्यातील खऱ्या समस्यांकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे जे वास्तव आहे, ते मांडणं हाच माझा दृष्टिकोन होता" असे नागराज मंजुळे यांनी म्हटले आहे.

4 / 5
पुढे सैराटविषयी बोलताना नागराज मंजुळे म्हणाल, "सैराटची गोष्ट लिहित असताना माझ्या मनात विचार होता की, चित्रपटांमध्ये जसं प्रेमाचं जग दाखवलं जातं, ते वास्तवापेक्षा खूप वेगळं असतं. खऱ्या आयुष्यात प्रेमात असताना अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागतो. मला यामध्ये गरज नसताना नाट्यमयता आणण्याची गरज वाटली नाही आणि म्हणून मी आहे तसं वास्तव दाखवणारी गोष्ट ठेवली.", असं ते म्हणाले.

5 / 5
शेवटी नागराज मंजुळे म्हणाले, "सैराट या सिनेमाचा कधी बॉलिवूडमध्ये रिमेक होईल, असा मी विचारही केला नव्हता. मी फक्त माझा चित्रपट प्रामाणिकपणे बनवला. तो लोकांना किती आवडेल किंवा त्याचा रिमेक होईल का, याचा मी कधीच विचार केला नव्हता."

Follow Us