‘सैराट’ फेम आर्चीच्या बाबांच्या खऱ्या बायकोचे फोटो समोर, सुरेश विश्वकर्मा खास फोटो पोस्ट करत म्हणाले…
'सैराट' सिनेमाने फक्त मराठी सिनेमाविश्वात रचलेला विक्रम कोणी विसरुच शकत नाही. सिनेमात अभिनेत्री रिंकू राजगुरु हिनेम आर्चीची भूमिका साकारली होती. तर आर्चीच्या ऑनक्रिन वडिलांची भूमिका अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी साकारली होती. आता त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खुद्द सुरेश यांनी फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

'सैराट' सिनेमातील काही सीन आणि गाणी कोणी विसरुच शकत नाही. सिनेमाला प्रदर्शित होऊन जवळपास 10 वर्ष झाली. पण आजही सिनेमातील कलाकारांना आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत.
'सैराट' सिनेमातील असंच एक पात्र म्हणजे आर्चीचे वडील... अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी आर्चीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. आता त्यांच्या बायकोचे फोटो समोर आले आहेत. सुरेश यांनी बायकोसोबत काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
सुरेश विश्वकर्मा यानी पत्नीसोबत रोमँटिक अंदाजात फोटो पोस्ट केले आहे. फोटोमध्ये त्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे घातले आहेत, तर त्यांच्या पत्नीने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. फोटोमध्ये दोघे सुंदर दिसत आहेत.
सुरेश यांच्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या पत्नीचं नाव विद्या असं आहे. विद्या सोशल मीडियावर कायम पतीच्या सिनेमांचे अपडेट्स सांगत असतात. विद्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.
सुरेश विश्वकर्मा यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी 'मुळसी पॅटर्न', 'सैराट', 'रेगे' यांसारख्या सिनेमात काम केलं आहे, सोशल मीडियावर देखील सुरेश कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.