श्रद्धा, परंपरा आणि…, पारंपरिक साडीत फोटो पोस्ट करत ‘सैराट’ फेम आर्चीचं लक्षवेधी कॅप्शन
अभिनेत्री रिंकू राजगुरु 'सैराट' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली आणि तिने सर्वांच्या मनात अर्ची म्हणून राज्य केलं. पण रिंकू येथेच थांबली नाही, तिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चहत्यांच्या मनावर राज्य केलं. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी देखील अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

अभिनेत्री रिंकू राजगुरु हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. 'सैराट' सिनेमातून रिंकू हिला एका रात्रीत लोकप्रियता मिळाली, त्यानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आता रिंकूला पाहिल्यानंतर चाहत्यांनी ही तिच अर्ची आहे का? यावर विश्वास बसत नाही.
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या साध्या लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र रिंकू हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
रिंकू हिने साडीमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'श्रद्धा, परंपरा आणि सुंदर छोट्या क्षणांच्या दरम्यान कुठेतरी...' असं लिहिलं आहे.
फोटोवर चाहते आहे लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. रिंकू हिच्या फोटोंवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सैराट मधील ही तीच हिरोईन आहे.. आता विश्वास बसत नाही.. अशी कमेंट एका चाहत्यांने केली आहे.
रिंकू हिच्याबद्दल सांगायचं झालं तर 'सैराट' सिनेमातून एका रात्रीत स्टार झाल्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील अभिनेत्रीने पदार्पण केलं आहे. सोशल मीडियावर देखील रिंकू कायम सक्रिय असते.