Salim Khan Hospitalized: सलीम खान अद्यापही रुग्णालयात… कठीण काळात 6 सेलिब्रिटींची सलमानला भक्कम साथ

Salim Khan Hospitalized: अभिनेता सलमान खान आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य गेल्या काही दिवसांपासून चिंतेत आहेत. कारण सलीम खान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशात सलमान खान याच्यासोबत 6 सेलिब्रिटी भक्कम आधार म्हणून उभे राहिले आहेत.

| Updated on: Feb 22, 2026 | 2:53 PM
1 / 6
अभिनेता आमिर खान याच्यासोबत गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान याची घट्ट मैत्री आहे. आमिर कायम चांगल्या - वाईट प्रसंगी सलमान याच्यासोबत असतो. आता देखील  आमिर याची सलमान याला भक्कम साथ लाभली आहे.

अभिनेता आमिर खान याच्यासोबत गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान याची घट्ट मैत्री आहे. आमिर कायम चांगल्या - वाईट प्रसंगी सलमान याच्यासोबत असतो. आता देखील आमिर याची सलमान याला भक्कम साथ लाभली आहे.

2 / 6

अभिनेता अजय देवगण देखील सलमान खान याचा चांगला मित्र आहे. खान कुटुंबियांच्या कठिण काळात अजय देखील सलमान याच्यासोबत एक भक्कम आधार म्हणून उभा आहे... अजय याने रुग्णालयात हजेरी लावत सलीम खान यांच्या आरोग्याची विचारणा केली.

3 / 6

साजिद नाडियाडवाला आणि सलमान खान यांची जुनी मैत्री आहे. साजिद नाडियाडवाला सलमान खानच्या वडिलांची विचारपूस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती स्थिर असल्यास सलीम खान यांनी सोमवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल..

4 / 6

अभिनेता संजय दत्त आणि समलान खान यांची मैत्री फार वर्ष जुनी आहे. संजूबाबा, सलमान याला स्वतःला लहान भाऊ मानतो... अशात सलीम खान रुग्णालायत असताना संजय सतत रुग्णालयात येत त्यांच्या आरोग्याची विचारपूस करत आहेत...

5 / 6

अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांच्याबद्दल काही बोलायलाच नको... शाहरुख याने अनेक कार्यक्रमांमध्ये खान कुटुंबियाचे आभार मानले आहे. किंग खान याने देखील रुग्णालयात हजेरी लावत सलीम खान यांच्या आरोग्याची विचारणा केली.

6 / 6

सलमान खान याच्या मित्रांच्या यादीत सुनील शेट्टी याचं देखील नाव अव्वल स्थानी आहे. अनेकदा सुनील याने सलमान याचं कौतुक केलं आहे. तर, आज खान कुटुंबियांच्या कठीण काळात सुनील शेट्टी देखील सोबत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us