
सलमान खानच्या करिअरमध्ये सर्वोत्तम चित्रपटांमध्ये 'बजरंगी भाईजान' एक आहे. वर्ष 2015 साली आलेल्या या चित्रपटात सलमान मुन्नीला तिच्या कुटुंबाकडे पोहोचवतो. 'पाकिस्तानी मुन्नी' बनलेल्या हर्षाली मल्होत्राने आपल्या अभिनयाने सर्वांच मन जिंकलं. आता हर्षालाी खूप बदलली आहे. हर्षाली आपलं सौंदर्य आणि ग्लॅमरने इंटरनेटचा पारा वाढवत असते. या दरम्यान ती तिच्या मम्मीमुळे सुद्धा चर्चेत असते.

17 वर्षांची हर्षाली मल्होत्रा सतत काम करतेय. अलीकडेच तिला एक साऊथचा चित्रपट मिळाला. 'अखंडा 2' मध्ये ती Janani चा रोल साकारणार आहे. हर्षालीची आई सुद्धा सौंदर्यात कुठे कमी नाहीय. तिच्या आईच नाव काजल मल्होत्रा आहे. हर्षाली अनेकदा तिच्या मम्मीसोबत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत असते. मुन्नीला तिच्या आईचा पूर्ण सपोर्ट आहे.

सौंदर्यच नाही, स्टाइलमध्ये सुद्धा काजल मल्होत्रा कुठल्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीय. मुलगी हर्षाली सोबत ती सुद्ध खूप पॉपुलर झाली आहे. काजल यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट आहे. पेशाने काजल मल्होत्रा इंटीरियर डिजायनर आहे. त्या मुलीच सुद्धा इन्स्टाग्राम अकाऊंट संभाळतात.

जेव्हा हर्षाली मल्होत्राला 'बजरंगी भाईजान'साठी साइन केलं, त्यावेळी तिने 2-3 लाख रुपये फी घेतली होती. हर्षाली मल्होत्राची मम्मीच नाही पप्पा सुद्धा चर्चेत असतात. विपुल मल्होत्रा पेशाने बिझनेसमन आहे. हर्षालीची आई सुद्धा आपल्या स्टाइलने प्रत्येकाच लक्ष वेधून घेते.

हर्षाली मल्होत्रा सोशल मीडियावरुन तगडी कमाई करते. चित्रपटांपासून सोशल मीडियापर्यंत तिच्या प्रत्येक मोठ्या निर्णयामध्ये आईचा सहभाग असतो. मम्मीसोबत तिचं चांगलं बॉन्डिंग आहे. सलमान खानचा एक चित्रपट धुडकावल्याचा तिचा किस्सा व्हायरल झाला होता.