सलमानच्या बर्थडे पार्टीत कथित गर्लफ्रेंडने वेधलं सर्वांचं लक्ष; पहा फोटो

भाऊ सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त बहीण अर्पिता खानने तिच्या निवासस्थानी खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सलमानची कथित गर्लफ्रेंड लुलिया वंतूरसुद्धा पार्टीला पोहोचली होती.

| Updated on: Dec 27, 2024 | 9:16 AM
1 / 5
बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता  सलमान खान आपला 59 वा वाढदिवस साजरा करतोय. बहीण अर्पिता खानने यानिमित्त खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटीसुद्धा उपस्थित होते.

2 / 5
वाढदिवसाच्या पार्टीत सलमान खानने अत्यंत स्टाइलमध्ये एण्ट्री केली. या पार्टीला आलेल्या सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3 / 5
सलमानची कथित गर्लफ्रेंड लुलिया वंतूरसुद्धा या पार्टीला पोहोचली होती. लुलिया आणि सलमानचं नातं अनेकदा चर्चेत आलं आहे. काही महिन्यांपूर्वी या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा होत्या. मात्र त्यानंतरही लुलियाला अनेकदा सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत पाहिलं गेलंय.

4 / 5
सलमान खानचा अत्यंत जवळचा मित्र आणि अभिनेता रितेश देशमुख त्याच्या पत्नी आणि मुलांसह या पार्टीला पोहोचला होता.

5 / 5
बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकीसुद्धा या पार्टीला पोहोचला होता. काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.