
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. ऐश्वर्या राय हिच्यापासून ते कतरिना कैफपर्यंत अनेक अभिनेत्रींना सलमान खान याने डेट केले आहे.

गेल्या काही वर्षांपासून सलमान खान हा यूलिया वंतूर हिला डेट करतोय. 24 जुलैला रोजी यूलिया हिचा वाढदिवस होता. यूलिया ही आता 44 वर्षांची झालीये.

यूलिया हिचा वाढदिवस धूमधडाक्यात सलमान खान याने आपल्या कुटुंबियांसोबत आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीमध्ये साजरा केलाय.

यूलिया हिच्या वाढदिवसाच्या पार्टीचे काही खास फोटो व्हायरल होत आहेत. सलमान खान याचे जीजू अतुल अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर यूलिया हिच्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये सलमान खान, शेरा, आयुष शर्मा, अर्पिता खान, अरहान खान, मीका सिंह हिमेश हेशमिया असे बरेचजण दिसत आहेत. आता हेच फोटो व्हायरल होत आहेत.